29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरदेश दुनियाअफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

Google News Follow

अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची बातमी काही वेळापूर्वी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तालिबानी दहशतवाद्यांनी तब्बल दीडशे भारतीय नागरिकांचे अपहरण केल्याचे सांगितले जात होते. पण असे कोणत्याही प्रकारचे अपहरण झाले नसून भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला असून भारतीय नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आज दुपारी पाऊण वाजायच्या सुमारास अफगाणिस्तानातून तालिबानी अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांचे अपहरण केल्याची बातमी समोर आली. अफगाणिस्तानातून आपली सुटका व्हावी यासाठी प्रयत्नात असणाऱ्या नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले जात होते. काबुल मधून हे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. तरी या अपहरण झालेल्या नागरिकांमध्ये काही भारतीयांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

व्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा

थोड्या वेळाने दीडशे भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. या बातमीने भारतातील नागरिक चिंताक्रांत झालेले दिसले. पण तालिबानी प्रवक्त्यां कडून या दाव्याचे खंडन केले जात होते. तालिबानी प्रवक्ता अहमदुल्लाह वासेक यांनी या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते.

सुमारे अर्ध्या तासानंतर या विषयात अधिक तपशील समोर येऊन सर्व भारतीय नागरिक असुरक्षित असल्याचे समजले. ही बातमी कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. भारतीय नागरिकांचे पासपोर्ट आणि कागदपत्र याची छाननी होत असून त्यांना भारतात परत पाठवण्याचे दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच त्यांना काबुल विमानतळा नजीकच्या एका गॅरेजमध्ये सुखरूप हलवले जाणार असल्याचे समजत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारही युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा