31 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरदेश दुनियाभारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण

भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण

Google News Follow

Related

हृदयविकार असलेल्या १९ वर्षीय आयशा रशन या पाकिस्तानी तरुणीला दिल्लीत सीमेपलीकडून हृदय दाता मिळाल्याने तिला नवीन जीवन मिळाले आहे. चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअरमध्ये ही मोफत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
आयशा रशन गेल्या दशकापासून हृदयविकाराने त्रस्त होती. सन २०१४मध्ये ती भारतात उपचारासाठी आली होती. तेव्हा तिच्या निकामी झालेल्या हृदयाला आधार देण्यासाठी हृदय पंप बसवण्यात आला. मात्र हे उपकरण कुचकामी ठरले आणि डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपणाची शिफारस केली.

आयशा रशनच्या कुटुंबाने चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण संस्थेचे संचालक डॉ. केआर बालकृष्णन आणि सहसंचालक डॉ. सुरेश राव यांच्याकडून सल्ला मागितला. आयेशाच्या हृदयाच्या पंपातून गळती झाल्यामुळे हृदय प्रत्यारोपण आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आणि तिला एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) प्रक्रियेवर ठेवण्यात आले. तथापि, प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी लागणारा अंदाजे ३५ लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्यामुळे कुटुंबाने टाळाटाळ केली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने कुटुंबाला आर्थिक मदत करणाऱ्या ऐश्वर्याम ट्रस्टशी जोडले. सहा महिन्यांपूर्वी, आयशा रशनला दिल्लीतून हृदय मिळाले आणि देशात १८ महिन्यांच्या वास्तव्यानंतर एमजीएम हेल्थकेअरमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

आयशाने यानंतर कृतज्ञता व्यक्त केली असून डॉक्टरांसह भारत सरकारचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ‘जेव्हा आयशा भारतात आली, तेव्हा ती जेमतेम जिवंत होती. तिचे शरीर केवळ १० टक्के कार्यान्वित होते,’ अशी आठवण तिची आई सनोबरने काढली.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले

अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

जनता दलाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या!

भारतात तीन दशकांहून अधिक काळ वारसा कर होता, इंदिरा गांधींची संपत्ती त्यांच्या नातवंडांना हस्तांतरित करण्याच्या एक महिना आधी राजीव गांधी सरकारने तो रद्द केला!

‘मोकळेपणाने सांगायचे तर, भारताच्या तुलनेत पाकिस्तानकडे चांगल्या वैद्यकीय सुविधा नाहीत. मला वाटते की भारत खूप मैत्रीपूर्ण आहे. जेव्हा पाकिस्तानमधील डॉक्टरांनी सांगितले की तेथे प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध नाही, तेव्हा आम्ही डॉ. केआर बालकृष्णन यांच्याशी संपर्क साधला. मी या उपचारासाठी भारत आणि डॉक्टरांचे आभार मानते,’ असे सनोबर म्हणाल्या. आयशाला फॅशन डिझायनर व्हायचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा