30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरदेश दुनियाचीनने बंद करायला लावले ऍपलवरील 'कुराण ऍप'

चीनने बंद करायला लावले ऍपलवरील ‘कुराण ऍप’

Related

चीनने जगातील लोकप्रिय असलेल्या ऍपलच्या कुराण ऍपवर बंदी घातली असून देशातील प्लेस्टोअरमध्ये आता हे ऍप दिसणार नाही. त्यासोबतच ऑलिव्ह ट्री बायबल ऍपवरही चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

भारतात अशाप्रकारे कोणती कारवाई केली असती तर त्यावर देशभरात केवढा गहजब माजला असता याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. शिवाय, चीनने घेतलेल्या या निर्णयाबद्दल भारतातील तथाकथित पुरोगामी, लिबरल्सनी जराही आवाज उठविलेला नाही, याचीही आठवण आता लोक करून देऊ लागले आहेत.

‘कुराण मजिद’ हे जागतिक स्तरावर सुमारे दीड लाख रिव्ह्यूज असलेले ऍप आहे. बीबीसीने हे वृत्त दिले असून यासंदर्भात चीनने मात्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

चिनी सरकारच्या मते या ऍपसाठी आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे ते ऍप काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे या ऍपची निर्मित करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.

ऍप्पलने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण बीबीसीला त्यांच्या मानवाधिकार धोरणांचा संदर्भ घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांना स्थानिक कायद्यांशी बांधील राहावे लागते. त्यामुळे सरकारशी काही गोष्टीत मतभेद होऊ शकतात.

या ऍपने कोणत्या नियमांचा भंग केला आहे, हे कळलेले नाही. चीन ही ऍप्पलचे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीनच्या निर्मिती क्षेत्रावर ऍप्पलचा पुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे ऍप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्यावर टीका होत आहे. कारण एकीकडे ते अमेरिकेतील राजकारणावर टीका करतात पण आता चीनच्या या निर्णयाबद्दल कोणतीही भूमिका घेत नाहीत. कूक यांनी २०१७मध्ये सात मुस्लीम बहुल देशांवर घातलेल्या बंदीवर टीका केली होती. पण आता ऍप्पलमधील या कुराण ऍपवर बंदी घातल्यावर मात्र चीनमधील नियमांशी आपल्याला बांधील राहावे लागते अशी भाषा ते करत आहेत.

 

हे ही वाचा:

‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज?

देवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार

एलएसीवरील सैनिक शिकणार ‘तिबेटोलॉजि’

‘बांगलादेशात जे घडले तेच मुंबईत घडणार आहे…’

 

मध्यंतरी ट्विटर आणि फेसबुक यांना भारत सरकारने देशांतर्गत नियमांच्या अधीन राहण्याच्या सूचना केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर केंद्र सरकारलाच धारेवर धरण्याचा प्रयत्न भारतातील पुरोगामी मंडळींनी केला होता. पण आता हीच मंडळी चीनमध्ये कुराण ऍपवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर एक शब्दही काढताना दिसत नाहीत, याबद्दल सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,510अनुयायीअनुकरण करा
4,880सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा