लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. इराण समर्थित हिजबुल्लाने इस्रायलवर आत्मघाती ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, ज्यामध्ये चार इस्रायली सैन्याचे जवान ठार झाले आहेत आणि अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हिजबुल्लाने बिन्यामीना येथील लष्करी तळावर हल्ला केला. इस्रायलवरील हिजबुल्लाहने केलेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. इस्रायलमधील या हल्ल्यात आतापर्यंत ६७ लोक जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिजबुल्ला दहशतवादी संघटनेने प्रक्षेपित केलेल्या मानवरहित हवाई वाहनाने (यूएव्ही) इस्रायली लष्कराच्या तळावर हल्ला केल्याने इस्रायली सैन्याचे चार जवान ठार झाले, असे इस्रायल संरक्षण दलाने सांगितले. आयडीएफने कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला असून कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी लोकांना अफवा पसरवण्यापासून किंवा जखमींची नावे शेअर करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.
Israel Defense Forces tweets, "Yesterday, a UAV launched by the Hezbollah terrorist organization hit an army base. 4 IDF soldiers were killed in the incident. The IDF shares in the grief of the bereaved families and will continue to accompany them. We ask to refrain from… pic.twitter.com/bfpdQ1BL7w
— ANI (@ANI) October 13, 2024
हिजबुल्लाने इस्रायलच्या हैफा शहराला लक्ष्य करत सुमारे २५ रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलच्या चॅनल १२ नुसार, हल्ल्यापूर्वी कोणताही इशारा सायरन देण्यात आला नव्हता. रविवारी रात्री उत्तर इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.
७ ऑक्टोबर २०२३ पासून हिजबुल्लाने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाचे म्हणणे आहे की त्यांनी बिन्यामीना येथील इस्रायली सैन्याच्या गोलानी ब्रिगेड कॅम्पवर हल्ला केला आहे. निवेदनात हिजबुल्लाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून आम्ही गोलामी ब्रिगेड कॅम्पवर अनेक ड्रोन उडवले असल्याचे म्हटले आहे. गोलानी ब्रिगेड ही इस्रायली लष्कराच्या पाच पायदळ ब्रिगेडपैकी एक आहे. याआधी हिजबुल्लाने लेबनॉनमधून इस्रायलवर पाच प्रोजेक्टाइल डागले होते, जे इस्रायली सैन्याने यशस्वीरित्या रोखले होते.
हे ही वाचा:
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा
बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’
बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!
इस्रायलने १ ऑक्टोबर रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या विरोधात जमिनीवर कारवाई सुरू केली. या युद्धादरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हवाई आणि रॉकेट हल्ले केले जात आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मृतांचा आकडा दोन हजारपेक्षा जास्त झाला आहे.