28.9 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरदेश दुनियाइस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

Google News Follow

इस्रायल आणि हमासमध्ये जवळपास गेले दोन आठवडे सुरु असलेला संघर्ष आज थांबला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युध्द विरामावर एकमत झाले आहे. एकाचवेळी दोन्हीकडून हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्राएलचे पंतप्रधान नेतन्याहूंच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी युध्द विरामाच्या बाजूने मतदान केले. आजपासून (शुक्रवार) हा युद्ध विराम अमलात येणार आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमास यांच्यातील संघर्ष काही नवा नाही, परंतु हा संघर्ष दोन आठवड्यापूर्वी पुन्हा एकदा उफाळून आला. पॅलेस्टाईन आणि इस्रायली सुरक्षा दलांमध्ये दोन आठवड्यापूर्वी शुक्रवारी रात्री जेरूसलेमच्या अल अक्सा मशिदीत हिंसक चकमक झाली. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यातील चकमकीचं परिवर्तन हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये झालं.

हमास ही पॅलेस्टाईनची सर्वात मोठी इस्लामी कट्टरतावादी संघटना आहे, ज्याची निर्मिती १९८७ सालच्या आंदोलनावेळी झाली. या भागातील इस्रायली सेनेला हटवणं हाच गेल्या तीन दशकांपासून लढणाऱ्या हमासचं मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत

आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस

पंचनाम्यानंतरच मदत

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

हमासचं पूर्ण नाव हरकत अल मुकावमा अल इस्लामिया आहे. याचाच अर्थ इस्लामिक रिजिस्टन्स मुव्हमेंट. रिजिस्टन्स म्हणजे प्रतिकार किंवा विरोध. या संघटनेची निर्मिती शेख अहमद यासीन या पॅलेस्टाईनच्या मौलानाने केली होती. तो इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूड या पॅलेस्टिनी शाखेचा भाग होता. हमासच्या निर्मितीची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. डिसेंबर १९८७ मध्ये जेव्हा हमासची निर्मिती झाली. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये इंतिफादाचीही सुरुवात झाली. इंतिफादा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे उलथापालथ घडवणे. पॅलेस्टाईनमध्ये सुरु झालेल्या इंतिफादा चळवळीचा उद्देश होता की इस्रायलपासून मुक्ती मिळवणं. त्यांचं मुख्य लक्ष्य होतं ते वेस्ट बँक, गाझा आणि पूर्वी जेरुसलेमला इस्रायलच्या ताब्यातून सोडवणं.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा