29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण मुख्यमंत्री म्हणाले, पंचनाम्यानंतरच मदत!

मुख्यमंत्री म्हणाले, पंचनाम्यानंतरच मदत!

Related

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ मे) रत्नागिरीला भेट दिली आणि नंतर ते सिंधुदुर्गमध्ये वायरी गावात गेले. तेथे त्यांनी पंचनामे झाल्यानंतर कोणत्या निकषानुसार मदत देता येईल, ते जाहीर होईल असे सांगितले. जे काह शक्य आहे तेवढे दिले जाईल, असेही मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहे. गेल्यावर्षी निसर्ग वादळामुळे कोकणाला फटका बसला होता. आता तौक्ते चक्रीवादळामुळे फटका बसल्याने मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार याची प्रतीक्षा होती. पण त्यांनी थेट मदत जाहीर केलेली नाही. हा पाहणी दौरा चार-पाच तासांचा होता.

मालवणच्या चिवला बीचवरही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. पंतप्रधानांनाही या अवस्थेची माहिती कळविलेली आहे. आम्हाला केंद्राकडून मोठी मदत हवी असेही त्यांना कळविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मंडणगड तालुक्यात २०० घरांचे, दापोली तालुक्यात ३५०, खेड तालुक्यात ३०, गुहागर ५, चिपळूण ६५, संगमेश्वर १०२, रत्नागिरी २००, राजापूर ३२ असे मिळून एकूण १ हजार २८ घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये १, लांजामध्ये १ आणि राजापूरमध्ये ५ असे एकूण ७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये १, संगमेश्वरात १, रत्नागिरीमध्ये ३ आणि राजापूरमध्ये ३ असे एकूण ८ नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये १ बैल, संगमेश्वरात १ बैल आणि रत्नागिरीमध्ये २ शेळ्या असे ४ पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये ४५० झाडांची पडझड झाली असून १४ दुकाने व टपऱ्या, ९ शाळा, तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.

सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील तीन दिवसांचा कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस बुधवार रायगड, गुरुवार रत्नागिरी, तर आज (शुक्रवारी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत.

हे ही वाचा:

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

पश्चिम बंगालमधील पिडीत हिंदूंच्या मदतीसाठी विहिंपचा पुढाकार

तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास ८० टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा