30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरराजकारणराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

Google News Follow

Related

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी राष्ट्रपतींकडे आजच्या दिवसाचे औचित्य साधत एक विशेष मागणी केली आहे. स्टालिन यांनी राष्ट्रपतींकडे राजीव गांधींच्या सर्व ७ मारेकऱ्यांना सोडण्याची विनंती केली आहे. आज (२१ मे) २०२१ रोजी राजीव गांधींच्या हत्येला ३० वर्ष पूर्ण होत आहेत.

२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम या संघटनेनं हत्या घडवून आणली. चेन्नईजवळच्या श्रीपेरंबदूर या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराला गेले असताना राजीव गांधी यांना हार घालण्यासाठी एक महिला पुढे आली आणि तिने आपल्या जवळील बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यातच राजीव गांधींचा मृत्यू झाला.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नातू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र असलेल्या राजीव गांधींनी ब्रिटनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं होतं. १९६६ साली ते पायलट बनले. राजकारणात यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. पण संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर १९८० साली त्यांना नाईलाजास्तव राजकारणात यावं लागलं. १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभेच्या तीन-चतुर्थांश जागा जिकल्या होत्या. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. मधल्या काळात त्याच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि काँग्रेसला लोकसभेत पराभव पत्करावा लागला. १९९१ साली व्हीपी सिंग यांचे सरकार पडल्यानंतर देशात निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान बनतील असं वातावरण निर्माण झालं.

श्रीलंकेतीत उत्तर भागात, जाफना प्रातांत तामिळ अल्पसंख्य लोक राहतात तर उर्वरित भागात सिंहली लोकांचे प्रमाण बहुसंख्य आहे. या दोन भाषकांतील वाद चिघळला आणि तामिळ लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ लागला. सिंहली लोकांच्या सरकारी आणि लष्करी अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून प्रभाकरनच्या नेतृत्वाखाली लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेची स्थापना १९८० साली करण्यात आली. ही एक प्रकारची बंडखोर संघटनाच होती.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

पश्चिम बंगालमधील पिडीत हिंदूंच्या मदतीसाठी विहिंपचा पुढाकार

लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने

भारतामध्ये, खासकरुन तामिळनाडूमध्ये मात्र श्रीलंकेतील या गृहयुद्धाकडे सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं जात होतं. अशातच १९८३ साली श्रीलंकेत लष्करातील काही सैनिकांची हत्या करण्यात आली. लष्कराने त्याचा सूड म्हणून श्रीलंकेतील तामिळ लोकांचा नरसंहार घडवून आणला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा