24 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरक्राईमनामा‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आणि संघटनेचा उपप्रमुख अब्दूल रौफ अजहर याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिका या दोन देशांनी मांडला होता.

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दूल रौफ अजहर याला काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव चीनने रोखून धरला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनवर टीका करण्यात येत आहे.

पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आणि संघटनेचा उपप्रमुख अब्दूल रौफ अजहर याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिका या दोन देशांनी मांडला होता. मात्र, हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाचा प्रस्ताव चीनने रोखून धरला. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी मांडलेला हा प्रस्ताव दुसऱ्यांदा चीनमुळे मंजूर होऊ शकला नाही.

यापूर्वीही भारत आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाही इतर देशांचा या प्रस्तावाला पाठींबा असताना चीनने मात्र त्याला विरोध दर्शवला होता.

हे ही वाचा:

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या

जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

जैश-ए-मोहम्मदच्या अब्दुल रौफ याचा भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग होता. १९९९ मध्ये भारतीय विमानाचे अपहरण, २००१ मध्ये संसदेवर करण्यात आलेला हल्ला आणि पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात रौफचा सहभाग होता. त्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. रौफ याचा काळ्या यादीत समावेश झाला असता तर त्याच्यावर जागतिक प्रवास बंदी घालण्यात आली असती. तसेच पाकिस्तानातील त्याची मालमत्ता, शस्त्रे आणि संबंधित सामग्री गोठवता आली असती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा