31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामा...आणि मोसाद स्टाइल चोक्सी झाला जेरबंद!

…आणि मोसाद स्टाइल चोक्सी झाला जेरबंद!

Google News Follow

Related

रहस्य… गूढ हालचाली… एका व्यक्तीला जाळ्यात अडकविण्यासाठी चाललेली व्यूहरचना… त्याला कानोकान खबर होणार नाही, याची घेतलेली पुरेपूर काळजी… त्यात शिरलेली अनोळखी पात्रं आणि शेवटी त्या व्यक्तीला आपल्या पंज्यात पकडण्यात आलेलं यश…अशा साऱ्या मसाल्याने खचाखच भरलेली कथा म्हणजे फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सीभोवती विणलेले जाळे. मोसादसारख्या गुप्तचर संघटनेकडून जसे अत्यंत थंड डोक्याने काम केले जाते, त्याच पद्धतीने चोक्सीचा गेम झाला.

बार्बरा नावाच्या एका महिलेच्या नादाने चोक्सी आता अलगद डॉमिनिका, अँटिगा आणि भारताच्या बर्म्युडा ट्रँगलमध्ये फसला आहे. मेहुल चोक्सीच्या पत्नीने त्या महिलेमुळेच आपला पती पकडला गेल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडियन बेटावर अँटिगा येथे स्थायिक असलेला चोक्सी गेल्या आठवड्यात अचानक गायब झाला आणि नंतर तो डॉमिनिका या देशात आढळला. त्या देशात अनधिकृत मार्गाने प्रवेश केल्याबद्दल अँटिगाकडून आता चोक्सीवर कारवाई होणार आहे.

हे ही वाचा:
पंजाब सरकारकडूनच लस पुरवठ्यात नफेखोरी?

अमेरिकेकडून भारताला लवकरच होणार लसपुरवठा

ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?

अवघ्या महिनाभरात महाराष्ट्राच्या महसुलात २३ टक्के घट

त्यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चोक्सीची पत्नी प्रीतीने म्हटले आहे की, या बार्बरा नावाच्या महिलेमुळे चोक्सीला भारतात नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जाळ्यात आपला पती अलगद सापडला. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२०मध्ये ही गूढ महिला आमच्या आयुष्यात आली. अँटिगातील आमच्या घरासमोरच तिने भाड्याने घर घेतले. तिनेच मेहुलला अँटिगाबाहेर नेले.

प्रीतीने म्हटले आहे की, ज्या बोटीने मेहुलला अँटिगाहून डॉमिनिकाला आणण्यात आले ती कोब्रा नावाच्या एका टूरिस्ट कंपनीची होती. त्यात दोन पंजाबी पुरुष होते. प्रीती पुढे म्हणते की, २३ मे रोजी मेहुल बार्बरासोबत जेवण घेण्यासाठी आपल्या कारने निघाला. मला तिचे खरे नावही माहीत नाही. ती बार्बरा जोसेफ आहे, की बार्बरा जेसिक आहे की बार्बरा सी? आमच्या घराशेजारीच ती राहात होती. गेल्या वर्षी २ ते ७ ऑगस्टदरम्यान ती आम्हाला भेटली. त्या बार्बराने मेहुलला तिच्या घराजवळ बोलावले होते. तिथून ते गाडीने जाणार होते. काही मिनिटांत ८ ते १० लोक तिथे धडकले आणि मेहुलसह ते निघून गेले.

मेहुलने नंतर मला सांगितले की, त्या बोटीवर भारतीय वंशाचे दोन पुरुष होते. त्यांची नावे गुरजित आणि गुरमित अशी होती. त्यातील एकाने सांगितले की, तो पंजाबी व्हीडिओ बनवतो.

ती आणि मेहुल भारतात येऊन सीबीआय, ईडीला सहकार्य करण्याच्या विचारात आहेत, का यावर प्रीतीने उत्तर देण्यास नकार दिला.

मायकेलभोवती चोक्सीप्रमाणेच रचला सापळा

मेहुल चोक्सीभोवती विणलेले जाळे आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिस्तियन मायकेलचे ‘अपहरण’ या घटनांत साधर्म्य असल्याचे ख्रिस्तियनचे वकील अलजिओ जोसेफ यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने चोक्सीला ‘गायब’ करण्यात आले तसेच मायकेलच्या बाबतीत झाले आहे.

या वकिलाने आरोप केला आहे की, मायकेलच्या बदल्यात दुबईची राजकुमारी प्रिन्सेस लतिफा हिला सुपूर्द करण्यात आले. लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या देशात अशा अपहरणाला मान्यता कशी मिळते?

जोसेफ या वकिलाने मायकेलचा मुलासह घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत आपले म्हणणे मांडले.

ईडीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, असे दावे याआधीही करण्यात आले आहेत. स्वतः मायकेलने असे दावे केले होते, पण त्याने जामिनासाठी केलेली याचिका फेटाळण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा