29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण पंजाब सरकारकडूनच लस पुरवठ्यात नफेखोरी?

पंजाब सरकारकडूनच लस पुरवठ्यात नफेखोरी?

Related

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी गुरुवारी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. बादल यांनी काँग्रेस सरकारवर कोरोना लसी खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीमध्ये विकल्याचा आरोप केला. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस १०६० रुपयांना खासगी रुग्णालयांना विकण्यात येत असल्याचं म्हटलं.

सुखबीर सिंह बादल यांनी पंजाब सरकारपंवर आणखी एक आरोप केला पंजाब मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा नाही. खासगी रुग्णालयांना कोरोना लसी वाढीव किमतीला विकल्या जात आहेत. पंजाब सरकार कोरोना लस ४०० रुपयांना विकत घेत असून १०६० रुपयांना विकत आहे.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी राज्यातील खासगी रुग्णालयात १५६० रुपयांना कोरोना लस दिली जात असल्याचं म्हटलं. पंजाब राज्यातील मोहाली येथे एका दिवसात खासगी रुग्णालयांना लसीचे ३५००० डोस विकल्याचा आरोप बादल यानी केला.

शिरोमणी अकाली दलानं यावेळी कोरोना लसींविषयी पंजाब सरकारच्या धोरणावर आम आदमी पार्टी शांत का आहे? असा सवाल केला. पंजाब सरकारंनं लस मोफत द्यावी, सरकारला हे जमणार नसेल तर आम्ही हायकोर्टात जाऊ, असं बादल म्हणाले आहेत.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ८८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

हे ही वाचा:

भोसले समितीत मराठा द्वेषी सदस्य

अण्णासाहेब पाटलांची हत्या काँग्रेसनं केली

आता मागासवर्ग आयोग नेमणं हे ठाकरे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

गेल्या २४ तासात भारतात १ लाख ३२ हजार ३६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७१३ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ७ हजार ७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा