33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणअभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल

अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सामान्य जनता कोविड लसीसाठी वणवण भटकत असताना काही अभिनेत्रींना मात्र बनावट ओळखपत्राच्या आधारे लस दिली जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्राच्या आधारे झालेले लसीकरणाचे प्रकरण ताजे आहे. अशातच आता अभिनेत्री सौम्या टंडन हीचे देखील बनावट ओळखपत्र समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयाचे ओळखपत्र मीरा चोप्रा हिला देण्यात आले, त्याच पार्किंग प्लाझा रुग्णालयाचे बनावट ओळखपत्र सौम्या टंडन हिला देखील देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करत ठाकरे सरकारमार्फत राज्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तरीही राज्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे नियमबाह्य लसीकरण होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बेकायदेशीर लसीकरणाचे प्रकरण बाहेर आले तेव्हा तिचे लसीकरण हे एका बनावट ओळखपत्राच्या आधारे झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे बनावट ओळखपत्र बाहेर आल्यानंतर राज्यातील लसीकरण मोहिमेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

दरम्यान आता अभिनेत्री सौम्या टंडन हिचे देखील बनावट ओळखपत्र समोर आले आहे. हे ओळखपत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या बनावट ओळखपत्राच्या आधारेच सौम्या टंडन या अभिनेत्रीनेही कोविड लसीवर डल्ला मारल्याचे आरोप होत आहेत. पार्किंग प्लाझा या कोविड रुग्णालयाचे हे ओळखपत्र असून यात सौम्या टंडन ही पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयात ऍडमिन म्हणून कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भारतीय वंशाच्या पूजा जसरानी यांची भरारी; नासाच्या फ्लाईट डायरेक्टर पदावर निवड

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?

 

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

शिवसेनेचे ठाणे, अभिनेत्यांची शिवसेना
या साऱ्या प्रकारावरून ठाणे महापालिका आणि ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेवर चौफेर टीका सुरु आहे. भारतीय जनता पार्टी या साऱ्या विषयात आक्रमक झाली असून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे ठाणे या शिवसेनेच्या प्रचार घोषणेचा आधार घेत भाजपाने शिवसेनेला टोला हाणला आहे. ‘शिवसेनेचे ठाणे, अभिनेत्यांची शिवसेना’ असे म्हणत भाजपाने ट्विट केले आहे.

‘ते’ ओळखपत्र खोटे:- सौम्या टंडन
पण अभिनेत्री सौम्या टंडन हिनेदेखील मीरा चोप्रा प्रमाणेच हे ओळखपत्र खोटे असल्याचे सांगत तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मी कोविड लसीचा पहिला डोस घेतला. पण तो माझ्या घरा नजीकच्या लसीकरण केंद्रावर घेतला. त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पुर्ण केली असल्याचे सौम्या टंडन हिने ट्विट करत सांगितले आहे.

२१ जणांना बनावट ओळखपत्र
मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र बाहेर आल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन सदस्यांची एक समितीही नेमण्यात आली. या समितीच्या अहवालात लसीकरणाच्या बाबतीतल्या अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मीरा चोप्रा हिच्यासोबत आणखीन २१ जणांचे फ्रंटलाईन वर्कर असल्याचे खोटे ओळखपत्र बनवण्यात आले होते. ही सर्व श्रीमंत घरातील मुले आहेत. यातल्या १९ जणांना सुपरवायझर म्हणून ओळखपत्र देण्यात आले आहे. तर दोन जणांना अटेंडंट म्हणून दाखवले गेले आहे. यातील १५ जणांना लसही देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा