26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरदेश दुनियाकाँग्रेस आजचा नवा मुघल, मुघलांनी देश कमकुवत केला

काँग्रेस आजचा नवा मुघल, मुघलांनी देश कमकुवत केला

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कर्नाटकात वक्तव्य

Google News Follow

Related

काँग्रेस पुन्हा भारताला कमकुवत करण्याचे काम करत आहे. यापूर्वी मुघलांनी देश कमकुवत केला होता काँग्रेस हा आजचा नवा मोगल आहे. राम मंदिर बांधले तर त्यांचा आक्षेप आहे असे त्यांनी काँग्रेसवर भाष्य केले आहे. मी हिंदू असल्याचे अभिमानाने सांगणारी व्यक्ती मला हवी आहे. असे त्यांनी म्हंटले आहे. सतत आपल्या विधानामुळे चर्चेत असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आता कर्नाटकात म्हंटले आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे अभिमानाने सांगतात कि ते मुस्लिम आहेत, अनेक लोक अभिमानाने सांगतात कि ते ख्रिस्ती आहेत यावर माझा आक्षेप नाही , पण आपण हिंदू आहोत असे अभिमानाने सांगणाऱ्या अशा व्यक्तीचीही आपल्याला गरज आहे.

सरमा पुढे असेही म्हणाले कि, इथे मी ऐकत आहे कि, लोक ‘जय शिवाजी’ आणि ‘भारत माता कि जय’ असे म्हणत आहेत. अशाच प्रकारे आपला देश विश्वगुरू बनेल असे सुद्धा ते म्हणाले.  बिस्वा यांनी मदरसे बंद करण्याच्या मोहिमेला पुन्हा एकदा हवा दिली असून आत्तापर्यंत त्यांनी ६०० पेक्षा जास्त मदरसे बंद केल्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व मदरशांना टाळे ठोकण्याचा माझा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना शिक्षणासाठी मदरशांची गरज नाही तर शाळा, महाविद्यालये, आणि विद्यापीठांची गरज आहे.

हे ही वाचा:

‘भल्लालदेव’ डागुबट्टीच्या उजव्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, किडनीही बसवली

लालबागमध्ये आईची निर्घृण हत्या करणारी तरुणी होती सँडविच विकणाऱ्याच्या संपर्कात

धीरेंद्र कृष्ण शास्त्री मिरारोडमध्ये; काँग्रेस, अंनिस म्हणतात कार्यक्रम होऊ देणार नाही

मुंबई सेंट्रल स्थानकाचा स्लॅब कोसळला, जीवीतहानी टळली

पुढे पाकिस्तानचा उल्लेख करत बिस्वा म्हणाले कि एकेकाळी दिल्लीच्या एका राजाने दिल्लीतील मंदिर पडण्याची चर्चा केली होती. मात्र नरेंद्र मोदी सरकारमध्ये राम मंदिर बांधण्याची चर्चा आहे. हा नवा भारत आहे. पाकिस्तानने येथे दहशतवादी पाठवले तर आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना ठार करतो. आजचा हा नवा भारत जो कोविड महामारीचा सामना करण्यासाठी स्वतःच्या लसी तयार करू शकतो तर पाकिस्तानवर बॉम्ब स्फोट घडवण्याची ताकद या नव्या भारतमध्ये आहे. असेही ते पुढे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा