33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियायुरोपात कोरोनाचा कहर, पण भारतात कोरोनाविरोधी कवच

युरोपात कोरोनाचा कहर, पण भारतात कोरोनाविरोधी कवच

Google News Follow

Related

एकीकडे युरोपात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चाललेला असताना भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात यशस्वी लसीकरण झाले आणि परिणामी, ही घट पाहायला मिळते आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट करत युरोप आणि भारतातील या परिस्थितीवर टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे कोरोना विरोधी कवच मिळाले. देशात झालेल्या विक्रमी लसीकरणामुळे मागील आठवड्यात रुग्णसंख्येत उणे १५ टक्के इतकी घट पाहण्यास मिळाली. याउलट जगभर मात्र कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याचे चित्र आहे.

रुग्णसंख्येत होणारी घट ही लसीकरण मोहिमेचे यश आहे, असे म्हणत ते लिहितात की, ‘हंगेरी या देशात मागील सात दिवसांत रुग्णसंख्येत ६६%, जर्मनीत ४९%, ऑस्ट्रियामध्ये ४३%, इटलीत ४३%, फ्रान्समध्ये ३९%, नेदरलॅंडमध्ये ३६% वाढ झाली आहे. नेदरलॅंड, ऑस्ट्रिया या देशांनी तर तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला आहे, ही परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे’.

रोमानियाच्या राजधानीतील मुख्य रुग्णालयातील शवगृहात सध्या जागाच शिल्लक नाही. बल्गेरियात डॉक्टरांनी सध्या छोट्या शस्त्रक्रिया करणे बंद केले असून संपूर्ण लक्ष कोरोना रुग्णांच्या उपचारांवर केंद्रित केले आहे. सर्बियाच्या राजधानीत कबर जास्त वेळ खुल्या ठेवण्यात येत आहेत जेणेकरून मृतदेह पुरण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल.

कोरोनाची लाट पुन्हा एकदा मध्य आणि पूर्व युरोपच्या काही देशांमध्ये जिथे लसीकरण कमी होत आहे अशा देशांमध्ये पसरली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी काही कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लादण्यात यावा, अशी मागणी केली आहे. लस उपलब्ध होण्यापूर्वीचे नियम पुन्हा लागू करण्यावर विश्वास नसून तसे असेल तर लसीला काय महत्त्व आहे, असा सवाल सर्बियाच्या पंतप्रधान अ‍ॅना ब्रनाबिक यांनी गेल्या महिन्यात विचारला होता. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बल्गेरिया, रोमानियामध्ये रुग्णांच्या मृत्यू संख्येमध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

वैद्यकीय सेवेतला ढिसाळपणा, लसीकरण मोहिमेतला गोंधळ ही सर्व या रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीसाठीची कारणे असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. या प्रदेशातील काही देशांमध्ये निवडणुका असल्यामुळे सरकारकडून लसीकरण मोहीम तीव्र आणि लॉकडाऊन होण्याची अधिक शक्यता आहे. रोमानियामध्ये मागील महिन्यात कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्बिया आणि हंगेरीमध्ये लसीकरण मोहिमेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा