एच-१बी व्हिसावरून अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. या व्हिसासाठी जे नव्याने अर्ज करतील त्यांना ८३ लाख शुल्क भरावे लागणार होते, त्यावरून जगभरात चर्चा झाली. मात्र आता ट्रम्प आपल्या नेहमीच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या शैलीत म्हणाले की, अमेरिकेत प्रतिभेची कमतरता असल्यामुळे परदेशातली प्रतिभा आपल्याला हवी आहे. पण ता त्यासाठी आकारले जाणारे शुल्क कमी करण्यास ट्रम्प तयार आहेत का, हे स्पष्ट झालेले नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा कार्यक्रमाचे समर्थन केल्याचे दिसले. या कार्यक्रमाचे बहुतेक लाभार्थी भारतीय आहेत. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेला उपलब्ध नोकऱ्यांसाठी स्थानिक कामगारांची कमतरता असल्यामुळे परदेशातील प्रतिभेला देशात आणणे आवश्यक आहे.
फॉक्स न्यूजवरील मुलाखतीदरम्यान, ट्रम्प यांना विचारण्यात आले की त्यांचे प्रशासन एच १ बी व्हिसा कार्यक्रमाला प्राधान्य देईल का, कारण यामुळे अमेरिकन कामगारांच्या वेतनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
त्यावर ट्रम्प म्हणाले की, “मी सहमत आहे, पण तुम्हाला प्रतिभावान लोकांना आणावेच लागते. मुलाखतकर्त्यांनी हस्तक्षेप करून म्हटले, “आपल्याकडे पुरेसे प्रतिभावान लोक आहेत.” त्यावर ट्रम्प तात्काळ म्हणाले, “नाही, तुमच्याकडे नाहीत.”
“तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्य नाही. लोकांना शिकावे लागते. तुम्ही बेरोजगारांच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तींना घेऊन म्हणू शकत नाही की ‘चल, तुला मिसाईल बनवणाऱ्या कारखान्यात कामाला ठेवतो’.”
ट्रम्प यांनी व्हिसाची वार्षिक फी १ लाख डॉलर (सुमारे ₹८३ लाख) इतकी वाढवल्यानंतर भारतीयांसह अमेरिकेतील संपूर्ण परदेशी कामगार समुदायात खळबळ उडाली होती. हा निर्णय इमिग्रेशनवर कडक निर्बंध आणण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नांचा एक भाग होता.
१९ सप्टेंबरच्या राष्ट्राध्यक्षीय आदेशानुसार, एच १ बी कर्मचारी अगदी विद्यमान व्हिसाधारकांनाही त्यांच्या कंपनीने ही रक्कम भरल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नव्हता. काळजी वाढल्यानंतर व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की ही फी फक्त नव्या अर्जदारांसाठी लागू आहे, विद्यमान व्हिसाधारकांसाठी नाही.
हे ही वाचा:
निठारी हत्याकांडातला खुनी आहे तरी कोण? पंधेरनंतर सुरेंद्र कोलीही निर्दोष
सोन्याचे दागिने देऊन महिलेचा अत्याचारातून थोडक्यात बचाव; आरोपी अटकेत
उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज
बेकायदेशी स्थलांतरितांवर छापा
मुलाखतीत पुढे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प म्हणाले की, सप्टेंबरमध्ये जॉर्जियातील ह्युंदाईच्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. “छापा यासाठी टाकला की ते बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढू इच्छित होते. तिथे दक्षिण कोरियातील लोक होते, जे आयुष्यभर बॅटरी बनवत होते. बॅटरी बनवणे अत्यंत अवघड काम आहे. तिथे स्फोटांचा धोका, अनेक समस्या असतात.
ट्रम्प पुढे म्हणाले, त्यांच्याकडे ५००–६००लोक होते, आरंभीच्या टप्प्यात बॅटरी बनवण्यासाठी आणि इतरांना शिकवण्यासाठी. पण त्यांना देशाबाहेर जायला सांगितले. तुम्हाला अशा लोकांची गरज आहे.”
या छाप्यात ३०० हून अधिक दक्षिण कोरियन कामगारांना ताब्यात घेण्यात आले. सोल सरकारने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले का याची चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना छाप्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.
दक्षिण कोरियातील ट्रम्पचे विधान
मागील महिन्यात ट्रम्प दक्षिण कोरिया दौर्यावर असताना त्यांनी या छाप्याला विरोध दर्शवला आणि ते म्हणाले, मी या कारवाईच्या पूर्णपणे विरोधात होतो.







