जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तामध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान बलुचिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी इस्लामाबादमध्ये एका कार्यक्रमात बलुच फुटीरतावाद्यांना कडक इशारा देत म्हटले की, “बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या कपाळावरील रत्न आहे, पुढील दहा पिढ्याही त्याला वेगळे करू शकणार नाहीत.” दरम्यान, जनरल असीम मुनीर यांच्या विधानाला बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार आणि तीक्ष्ण उत्तर दिले आहे.
मेंगल म्हणाले, “पाकिस्तानी सैन्याने १९७१ चा लज्जास्पद पराभव आणि ९०,००० सैनिकांचे आत्मसमर्पण कधीही विसरू नये. त्यांची शस्त्रेच नाही तर त्यांच्या पँटही अजून तिथे लटकत आहेत.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही म्हणता की बलोच तुमची शिक्षा १० पिढ्या लक्षात ठेवतील. पण मला सांगा, बंगालींकडून मिळालेली हार ही तुमच्या सैन्याच्या किती पिढ्याने लक्षात ठेवली आहे?. गेल्या ७५ वर्षांपासून बलुच लोक पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहेत. “आम्ही ते लोक आहोत जे तुमचा प्रत्येक गुन्हा लक्षात ठेवतो आणि आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही,” असे मेंगल म्हणाले.
हे ही वाचा :
राज्यातील ‘या’ १६ शहरात होणार ‘मॉक ड्रिल’!
“पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती?” मल्लिकार्जुन खरगेंचा दावा
सलीम पठाणवर वक्फ बोर्डाचे विश्वस्त असल्याचे भासवून भाडे उकळल्याचा आरोप
अख्तर मेंगल यांची ही प्रतिक्रिया केवळ राजकीय टिप्पणी नाही तर पाकिस्तानमधील अंतर्गत फूट आणि लष्कराची दडपशाही उघड करते. भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानवर बोटे उचलली जात असताना, बलुच नेत्याचा हा इशारा पाकिस्तानी स्थापनेसाठी एक गंभीर आव्हान म्हणून उदयास आला आहे.







