ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी पाकिस्तान पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी देत आहे. एकीकडे शांततेसाठी तयार असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे भारताला पुन्हा धमक्या द्यायच्या, असा पाकचा कारभार चालला आहे. याच दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताला धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले, पंतप्रधान मोदी गोळ्या आणि पाणी थांबवण्याबद्दल बोलत आहेत. भारत आम्हाला सतत धमकावत आहे, परंतु जर पुन्हा युद्ध झाले तर आम्ही भारताला धडा शिकवू. कधी ते म्हणतात की ते गोळ्यांनी उत्तर देतील, कधी म्हणतात की ते पाणी थांबवतील. माझा असा विश्वास आहे की सिंधू नदीच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा पाकिस्तानच्या लोकांचा हक्क आहे, असे शाहबाज शरीफ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. आपण १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. आता भारत पाण्यासाठी रात्रंदिवस धमकावत आहे. पण भारताने जर पुढे काही केले तर त्यांना धडा शिकवू.
दरम्यान, सुख चैन कि रोटी खाओ…वरना मेरी गोली तो है ही, या पंतप्रधान मोदींच्या विधानाची भीती पाकिस्तानमध्ये असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शाहबाज शरीफ यांच्यापासून बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण मोदींच्या या विधानाचा उल्लेख करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये भाषणादरम्यान मोदींच्या या विधानाचा उल्लेख केला, तर बिलावल भुट्टो अमेरिकेत याचा उल्लेख केला.
हे ही वाचा :
पडघा गाव आयसिसच्या कट्टर नेटवर्कचे गड का आणि कसे बनले?
IPL 2025 मधील पुरस्कार विजेत्यांची यादी
आयपीएल 2025: विजेत्यांना किती मिळाली बक्षीस रक्कम?
क्रुणाल पांड्याचा ऐतिहासिक पराक्रम
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले, पंतप्रधान मोदी सतत पाकिस्तानविरुद्ध भडकावणारी विधाने करत आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा उल्लेख केला. तसेच भारताबरोबर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले.







