मुंबईपासून अवघ्या ५९ किमी अंतरावर असलेले ठाणे जिल्ह्यातील पडघा हे गाव ‘जिओ-स्ट्रॅटेजिक’ दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ, सागरी किनारपट्टीलगतच्या वसलेले हे गाव गेली अनेक दशके राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून गाजत आहे. कुख्यात अतिरेकी साकिब नाचन याने या गावाला दहशतवादाच्या सापळ्यात एवढे जखडले आहे की काही वर्षांपूर्वी या गावातील मुस्लिम लोकांनी हे गाव भारताचा भाग नसून इस्लामिक स्टेटमधील अल-शाम आहे असे म्हणत चक्क देशातून फुटून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता.
बोरीवली-पडघा या दोन गावांची मिळून एकच संयुक्त ग्रामपंचायत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, पडघा गावाची लोकसंख्या ५,७८० इतकी होती. त्यापैकी यापैकी सुमारे ८३% लोक मुस्लिम धर्मीय होते. बोरीवली गावाची लोकसंख्या अंदाजे ७,००० असून, तेथील ९२% पेक्षा अधिक नागरिक मुस्लिम आहेत. या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की, पडघा-बोरीवली परिसर हा अत्यंत एकधर्मी, विशेषतः मुस्लिम बहुल, सामाजिक रचनेचा भाग बनला आहे
इतक्या प्रचंड प्रमाणात एकाच धार्मिक गटाची उपस्थिती असलेल्या गावांमध्ये, कट्टरतेचं बीज पेरणं आणि ते रुजवणं अधिक सोपं असतं. धार्मिक भावनांना हात घालून नव्या पिढ्यांना विचारधारात्मक प्रशिक्षण देणं शक्य होतं. हेच साकिब नाचनने केले. त्यामुळे हे गाव दहशतवादी नेटवर्कसाठी हे गाव महत्वाचे ‘हाईडआउट’ आहे. यापूर्वी दहशतवाद्याला पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकांवर तेथे हल्ले झाले आहेत.
२००२–०३ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात पडघा चर्चेत
सन २००२–०३ मध्ये गेट वे ऑफ इंडिया, घाटकोपर आणि झवेरी बाजार येथे झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात १३ दहशतवाद्यांपैकी पाच जण हे पडघा गावातील असल्याचे उघडकीस आले तेव्हा पडघा हे गाव राष्ट्रीय पातळीवर प्रथम चर्चेत आले. त्या कारवाईत साकिब नाचन हे पडघ्यातील स्लीपर सेलचा म्होरक्या म्हणून समोर आले. साकिब स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचा माजी अध्यक्ष होता. त्याला आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना बॉम्बस्फोट आणि शस्त्रसाठा प्रकरणात अटक झाली. त्यामुळे पडघा गाव पहिल्यांदा दहशतवादी नेटवर्कचा अड्डा म्हणून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलं.
२००३ साली जेव्हा साकिब नाचनला अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पडघ्यात छापा टाकला, तेव्हा स्थानिक नागरिकांनी कायदा अंमलबजावणाऱ्या यंत्रणेला उघड विरोध केला. साकिब आणि त्याच्या दहशतवादी साथीदारांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. त्यात अनेक अधिकारी जखमी झाले.
तेव्हा साकिबला अटक केल्यानंतर तपासात स्पष्ट झालं की, त्याने पडघा गावातील जंगलांमध्ये बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि अनेक तरुणांना त्या दिशेने प्रेरित केलं होतं. साकिबने थळ-भिवंडी मार्गावरील अज्ञात ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे प्रयोग केल्याचेही अहवालात नमूद आहे.
SIMI चा प्रभाव आणि पडघा
पडघा गावाचा दहशतवादाच्या दिशेने प्रवास हा अचानक घडलेला नाही, तर त्याची मूलभूत वैचारिक पायाभरणी ही सिमी (SIMI – Students’ Islamic Movement of India) या संघटनेच्या माध्यमातून दशकांपूर्वीच घडवली गेली होती. ‘भारतीय समाजाला पाश्चिमात्य संस्कृतीपासून मुक्त करून इस्लामी मूल्यांवर आधारित एक व्यवस्था निर्माण करावी’ अशी भूमिका सिमी ने घेतली होती. याच ध्येयधोरणातून पुढे अनेक कट्टरवादी गटांचा उगम झाला.
साकिब नाचन याचा कट्टरवादाचा प्रवास जमात-ए-इस्लामी पासून सुरू झाला. १९८०च्या दशकात त्याने सिमी मध्ये प्रवेश घेतला आणि लवकरच तो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नंतर संघटनेचा राष्ट्रीय सरचिटणीस झाला. मुंबईत त्याने भरवलेल्या सिमीच्या अधिवेशनास १०,००० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सन २००१ मध्ये सिमीवर बंदी घालण्यात आली तेव्हा सिमीच्या काही नेत्यांनी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना सुरु केली. साकिब इंडियन मुजाहिदीनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. साकिब सिमी चे राष्ट्रीय अध्यक्ष सी.ए.एम. बशीर याचा निकटवर्तीय होता. त्यामुळे सिमीवर बंदी घातली तेव्हा पडघा गाव सिमीच्या नेटवर्कमध्ये एक महत्त्वाचं केंद्र बनलं. याच काळात येथे गोपनीय बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या जागा, स्थानिक संपर्कवर्तुळे, निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रचार साहित्य यांचं विस्तृत जाळं उभं राहिलं. २००३ मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात साकिब आणि बशीर हेच म्होरके होते. बॉम्बस्फोट केल्यानंतर भारताबाहेर पळून गेलेल्या बशिरला नंतर कॅनडामध्ये अटक केली तेव्हा जिहादी मुस्लिम दहशतवादी आणि खलिस्तानवादी एकत्र आले आहेत असे स्पष्ट झाले.
पुढील काळात याच पायाभरणीचा वापर आय एस आय एस (ISIS) सारख्या नव्या आंतरराष्ट्रीय कट्टर संघटनांनी केला, आणि पडघा हे गाव हळूहळू दहशतवाद्यांसाठी महत्वाचे केंद्र झाले. साकिबने आणि त्याच्या साथीदारांनी आय एस आय एसच्या कट्टर विचारसरणीला पडघ्यात प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्न केला. पडघा गावाला “अल-शाम” (मुक्त क्षेत्र) जाहीर करून भारतातून फुटून निघण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हा प्रयत्न फसला. परंतु, असा प्रयत्न करण्यामागे स्थानिक मुस्लिम युवकांना भारतीय राज्यव्यवस्थेला नाकारण्यास प्रवृत्त करणे आणि गावकऱ्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेणे हे हेतू होते. हे साध्य करण्यासाठी केवळ धार्मिक प्रचारावर भर न देता, शस्त्रसाठा, ड्रोन, नकाशे आणि प्रशिक्षण व्यवस्थेची उभारणी करण्यात आली.
साकिब नाचन कोण?
साकिब नाचन यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील बोरीवली-पडघा गावातील संपन्न आणि प्रतिष्ठित कोकणी मुस्लिम कुटुंबात झाला. विद्यार्थीदशेतच तो जमात-ए-इस्लामी या कट्टरवादी संघटनेत पासून सुरू झाला. १९८०च्या दशकात तो सिमी मध्ये सक्रिय झाला आणि काही वर्षातच महाराष्ट्र ‘सिमी’चा अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय सरचिटणीस झाला. मुस्लिम कट्टरवादी संघटनांत त्याला “द बॉस” या टोपणनावाने म्हणून ओळखले जाई.
उपलब्ध माहितीनुसार १९८० च्या दशकाच्या मध्यातच साकिब नाचनने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय अतिरेकी नेटवर्कशी संपर्क प्रस्थापित केला होता. सीबीआयने त्याच्या विरोधात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, त्याने १९९० मध्ये पाकिस्तानमध्ये दोनदा जाऊन सलाहुद्दीन सुदानी आणि अब्दुर रहिम रसूल सय्यद यांच्यासारख्या दहशतवादी नेत्यांशी भेट घेतली आणि भारतीय मुस्लिम युवकांना स्फोटके आणि युद्धाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उभी केली. जिहादी मुसलमान दहशतवादी आणि खलिस्तानवादी अतिरेक्यांना एकत्र आणून भारताविरुद्ध बंड उभारण्याच्या “ऑपरेशन K2” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आय एस आय च्या कटात देखील तो सामील होता.
१९९२ मध्ये अहमदाबादमध्ये अटक होऊन त्याला टाडा अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा १० वर्षांवर आणली. ही शिक्षा भोगून तो २००१ मध्ये तुरुंगातून बाहेर आला.
हे ही वाचा:
क्रुणाल पांड्याचा ऐतिहासिक पराक्रम
भारताविरोधात ISI चा नवा तळ म्हणजे बांगलादेश
म्हणून राबविले जात आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर, मिशन फितूर…
भारताने चार दिवसांत पाकिस्तानची टिपली ६ फायटर जेट्स, ३० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे
साकिब नाचनला तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचं नाव थेट तीन वेगवेगळ्या खूनप्रकरणांशी जोडलं गेलं होतं. दोन हिंदू वकिलांचा आणि एका मुस्लिम व्यक्तीचा अमानुष खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर होता. या तिन्ही खटल्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली.
पुढे २००२–०३ च्या मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडली. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. साकिब नाचन या बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार होता. या स्फोटांच्या तपासादरम्यान नाचनच्या घरी एके-४७ आणि एके-५६ रायफल्स सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली, मात्र पोटा कायद्यांतर्गत अवैध शस्त्रसाठा प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून तो २०१७ साली तुरुंगातून मुक्त झाला.
महाराष्ट्रातील आय एस आय एस मॉड्युलचे नेतृत्व
२०१७ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर आय एस आय एस या जागतिक अतिरेकी संघटनेशी थेट संबंध प्रस्थापित करून तो महाराष्ट्रातील आय एस आय एस मॉड्युलचा म्होरक्या झाला. NIA च्या माहितीनुसार, नव्याने भरती केलेल्या दहशतवाद्यांना साकिब स्वतः आय एस आय एस च्या खलीफाला निष्ठा व्यक्त करणारी ‘Bayath’ शपथ देत असे. साकिबला आय एस आय एसने ‘अमीर-ए-हिंद’ (भारतासाठीचा प्रमुख जिहादी नेता) असा हुद्दा दिला होता.
साकिबने त्याच्या राहत्या पडघा गावालाच ISIS चे भारतातील केंद्र बनवले. त्याने गावातील आणि परिसरातील बहुसंख्य मुसलमान लोकांना स्थानिक संपर्क वर्तुळे, मशीद-मदरसे यांचं जाळं, आणि त्याच्या जुन्या सिमी आणि आयएमच्या नेटवर्कचा वापर करून, त्याने ISIS चे मॉड्यूल उभारले.
पडघा : दहशतवादाचं पिढीजात जाळं आणि साकीबच्या प्रभावाचा विस्तार
पडघा परिसरातील अतिरेकी जाळं हे साकिब आणि त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित नसून, ते त्याच्या जुन्या सहकाऱ्यांपासून त्यांच्या कुटुंबांपर्यंत – आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या कट्टर विचारसरणीपर्यंत – विस्तारलेलं आहे.
या साखळीत २००२-०३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी हसीब मुल्ला, तसेच त्याचा भाऊ फराक मुल्ला– जो SIMI शी संबंधित असल्याचा संशय आहे, यांची नावं समोर येणं ही कोणतीही अपवादात्मक घटना नव्हे, तर एक संघटित विचारसरणीचं प्रतिबिंब आहे.
२०२५ मध्ये या दोघांच्या घरांवर करण्यात आलेले छापे हे केवळ जुन्या गुन्ह्यांचा भाग नव्हते, तर ते ISIS शी संबंधित नव्या कट्टरपंथी हालचालींच्या स्पष्ट छाया दर्शवणारे होते. दिल्ली ISIS मॉड्यूलचा आरोपी शहनवाज आलम याने साकीब नाचनच्या प्रभावाखाली ‘बैयत’ (निष्ठेची शपथ) घेतल्याचं समोर येणं हे देखील या अतिरेकी नेटवर्कच्या सेंद्रिय, स्वाभाविक आणि सतत वाढणाऱ्या स्वरूपाचं स्पष्ट निदर्शन आहे.
पडघा परिसरात नाचन आणि मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांची नावे सतत पुन्हा पुन्हा समोर येत असणं हे केवळ त्यांच्या भूमिकेचं गांभीर्य दाखवत नाही, तर दहशतवादी विचारसरणी पिढ्यानपिढ्या जपली जात असल्याचं भयावह वास्तवही समोर आणतं.
पडघा मॉड्यूलमधील ‘छोटी मशीद’चे उघड झालेले कट्टरवादी स्वरूप
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की पडघा-बोरिवली येथील ‘छोटी मशीद’ मध्ये ISIS संदर्भातील नियोजन बैठकांना जागा दिली गेली होती. विशेषतः भर्ती मोहिमा रचण्यासाठी आणि गुप्त चर्चा करण्यासाठी दहशतवादी तेथे जात.
डिसेंबर २०२३ मध्ये NIA ने घेतलेल्या छाप्यांमध्ये जे साहित्य जप्त करण्यात आलं, त्यातून पडघा-मूलाधारित अतिरेकी जाळ्याचं स्वरूप, विचारसरणी आणि आर्थिक बळकटी यांचा ठोस आणि चिंताजनक पुरावा समोर आला.
जप्त करण्यात आलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये समावेश होता:
₹६८.०३ लाखांची बेहिशेबी रोकड एक पिस्तुल व दोन एअरगन्स ८ तलवारी, चाकू यांसह धारदार शस्त्रसाठा ३८ स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, हार्डडिस्क्स, CD/DVDs १० जिहादी विचारधारेची मासिकं आणि विशेषतः ५१ ‘हमास’चे झेंडे
हमासचे झेंडे – जरी ISIS आणि हामास यांच्यात विचारसरणीच्या बाबतीत अनेकदा विरोध असला, तरी यामागे इस्लामी कट्टरतेचा एकत्रित भावनिक अधिष्ठान निर्माण करण्याचा हेतू एकाच आहे.
या पार्श्वभूमीवर, दहशतवादविरोधी लढ्याची व्याप्ती ही केवळ कारवाई आणि बंदोबस्तापुरती मर्यादित न ठेवता, स्थानिक सामाजिक परिवर्तन, वैचारिक पुनर्जागरण, आणि सामुदायिक सहभागाच्या दिशेने अधिक व्यापक, दीर्घकालीन रणनीती आखण्याची आता नितांत गरज आहे.
पडघा हे केवळ भौगोलिक ठिकाण उरलेलं नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला थेट आव्हान देणारा एक वैचारिक रणभूमी बनलं आहे – जिथे लढा केवळ बंदुकींनी नव्हे, तर मनं जिंकूनच जिंकावा लागणार आहे.
