31 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरदेश दुनियामला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

Related

एकीकडे कोरोनामुळे पिचलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना एका शेतकऱ्याने आता गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

अनिल आबाजी पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील रहिवासी आहे.

 

त्याने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्याने म्हटले आहे की, मी शेतकरी असून मी कोणतेही पीक घेतले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यातच जाते. माझी स्वतःच्या मालकीची जमीन (गट नं. १८१/४) आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचेदेखील बिल लवकर मिळत नाही. त्यापेक्षा गांजाला चांगला भाव आहे. त्यामुळे मला माझ्या दोन एकरच्या जमिनीत गांजा लागवड करण्याची १५ सप्टेंबर २०२१पर्यंत परवानगी द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबर २०२१ला अशी परवानगी मिळाली असे गृहित धरून मी गांजाची लागवड सुरू करणार आहे. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याला आपले प्रशासन जबाबदार राहील.

हे ही वाचा:

कोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?

निराधार मुलांना ‘स्वनाथ’चा आधार

मतदानाचा अधिकार आहे; तर मद्यपानाचा पण द्या!

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

राज्यातील शेतकरी कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झाले असून गेल्या काही दिवसांत मंत्रालयाजवळ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा नंतर उपचारादरम्यान मृत्युही झाला. त्यामुळे या शेतकऱ्याने केलेली ही मागणी अशा आर्थिक विपन्नतेच्या निराशेतून केल्याचे समोर येते आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा