33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाकाबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

Google News Follow

Related

अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा नागरिकांना इशारा

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी लोकांना काबूल विमानतळावरून प्रवास करण्यापासून सावध केलेय. विमानतळाच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले. काबूल विमानतळाद्वारे लोकांना देशातून बाहेर काढले जात आहे.

काबूल विमानतळापासून सावध राहण्याची सूचना अशा वेळी आली आहे, जेव्हा देशातून बाहेर अमेरिकेच्या सैन्याला बाहेर पडण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी राजधानी काबीज केल्यापासून पाश्चिमात्य सैन्याने काबूल विमानतळावरून ८०,००० हून अधिक लोकांना बाहेर काढले. विमानतळावरील गोंधळात आठ जणांचा मृत्यूही झाला. द गार्डियनमधील एका अहवालात म्हटले आहे की, ‘दहशतवादी हल्ल्याच्या उच्च जोखमीबद्दल’ वाढत्या चिंतांबद्दल ब्रिटनला सांगितले गेले आहे. विशेषतः इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या इसिसने आत्मघातकी बॉम्बस्फोटांचा इशारा दिलाय.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अमेरिकनांना गेटच्या बाहेर सुरक्षा धोक्यांमुळे विमानतळावरून प्रवास किंवा जमू नये, असा सल्ला दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, एबी गेट, ईस्ट गेट किंवा नॉर्थ गेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी आता त्वरित निघून जावे. ऑस्ट्रेलियाच्या प्रवासी सल्लागारात म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय अस्थिर आणि धोकादायक आहे. मोठ्या जमावाच्या हिंसाचारामुळे धोका वाढू शकतो. त्यात म्हटले आहे की, विमानतळ परिसरात ऑस्ट्रेलियन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आणि पुढील आदेशाची वाट पाहण्याचा सल्ला दिला गेलाय.

हे ही वाचा:

तालिबानकडून ‘या’ पत्रकाराला मारहाण

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोचा चिखल

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी म्हणाले, “तालिबान्यांनी त्यांच्या पोस्टवर सुरक्षा वाढवली आहे आणि ते गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत. गर्दी मागील दिवसांच्या तुलनेत कमी आहे.” ते म्हणाले, “आम्ही त्यांना सुरुवातीच्या दिवसात त्या पातळीवर वाढताना पाहिले नाही.” पण हो, याचे कारण नक्कीच आहे, कारण तालिबानने या प्रदेशात प्रवेश आणि नियंत्रणाचे त्यांचे उपाय बळकट केलेत. किर्बी म्हणाले की, ३१ ऑगस्टनंतर विमानतळाचे व्यवस्थापन अमेरिकेची जबाबदारी राहणार नाही. ते म्हणाले की, अमेरिकन दूतावास सध्या विमानतळावरून काम करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा