अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेताच व्यापार धोरणांमध्ये बदल करत काही देशांवर २५% आणि भारत, ब्राझील सारख्या देशांवर ५०% इतके अतिरिक्त उच्च कर लादले आहेत. यावरून अनेक देशांशी अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. तर, त्यांच्या या कृतीवर अमेरिकेतूनच टीका केली जात आहे. जगभरातील अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली असून यावर आता, आयएमएफच्या माजी मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेकडून कर लादल्यानंतर सहा महिने उलटूनही अर्थव्यवस्थेवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झालेला नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त शुल्क लादले. शिवाय ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधांच्या आयातीवर १००% शुल्क लादण्यात आले, ज्याचा उद्देश अमेरिकन उत्पादन वाढवणे आणि व्यापार संतुलन सुधारणे आहे. मात्र, हार्वर्ड अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आणि आयएमएफच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी अलीकडेच या शुल्कांच्या परिणामाचे मूल्यांकन केले आणि यावरून टीका केली. त्या म्हणाल्या की, अंमलबजावणीनंतर सहा महिन्यांनी, या शुल्कांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला फारसा किंवा काहीही फायदा झालेला नाही.
गीता यांनी ट्रम्प सरकारला काही सवाल विचारात या निर्णयाची नकारात्मक बाजू समोर आणली आहे. त्या म्हणाल्या टॅरिफ लादून सहा महिने झाले आहेत. अमेरिकेच्या टॅरिफने काय साध्य केले आहे? सरकारसाठी महसूल वाढवायचा? हो. पण, याचा जवळजवळ पूर्णपणे भार हा अमेरिकन कंपन्यांनी उचलला आणि अमेरिकन ग्राहकांनी उचलला. त्यामुळे ते अमेरिकन कंपन्या/ग्राहकांवर करासारखे काम करत आहे. महागाई वाढवायची का? हो, थोड्या प्रमाणात. घरगुती उपकरणे, फर्निचर, कॉफीसाठी नक्कीच. याने व्यापार संतुलन सुधारेल का? अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह नाही. अमेरिकेतील उत्पादनात सुधारणा? अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह नाही. त्यामुळे एकंदरीत, स्कोअरकार्ड नकारात्मक आहे.
हेही वाचा..
दिवाळीआधी अजमेरमध्ये मोठी कारवाई
लोकांना ‘एनडीए’च्या विकास धोरणावर विश्वास
अभिनेता, लेफ्टिनंट कर्नल मोहनलाल यांचा सैन्यप्रमुखांकडून सन्मान
यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार गीता शहा यांना जाहीर
दरम्यान, अनेक तज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टॅरिफ धोरणावर चिंता व्यक्त केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी, जेएनयूचे प्राध्यापक आणि चीन अभ्यास तज्ज्ञ श्रीकांत कोंडापल्ली यांनी सांगितले की, भारतीय वस्तूंवर टॅरिफ लादण्याचा ट्रम्प यांचा निर्णय कदाचित अहंकारपूर्ण कारणांमुळे प्रेरित होता.







