34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरदेश दुनियापिण्यायोग्य स्वच्छ पाण्याच्या नियोजनाचे शिवधनुष्य पेलावे लागेल!

पिण्यायोग्य स्वच्छ पाण्याच्या नियोजनाचे शिवधनुष्य पेलावे लागेल!

जलदिनानिमित्त दिल्लीत झाली होती परिषद. तिथे पाण्याच्या सुरक्षिततेसाठी उपस्थितांनी मांडले विचार

Google News Follow

Related

आपण जर पाण्याचा योग्य वापर करू शकलो तरच येणाऱ्या पिढ्यांना आपण स्वच्छ पाण्याचा पुरवठा करू शकतो. कारण येत्या काळात स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याची कमतरता सर्व जगभर निर्माण होणार आहे, असा इशारा देतानाच पाण्याचे महत्त्व जलदिनाच्या निमित्ताने दिल्ली येथे पार पडलेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आले.

प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. त्यावेळी पाण्याच्या स्वच्छतेबाबत आणि उपलब्धतेबाबत जागरुकता वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. यावेळी नवी दिल्लीत ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या सहाय्याने जलदिनानिमित्त परिषदेचे आयोजन केले होते. त्यात विविध देशांचे राजदूत सहभागी झाले होते.

सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ताज्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता त्यात आरोग्य, संस्कृती, निसर्गाचे रक्षण अशा अनेक गोष्टींचाही संबंध येतो. भाजपाचे आमदार वागीश पाठक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, या जलदिनानिमित्त जलसुविधांचे संरक्षणासाठी सरकार जे प्रयत्न करत आहे, त्यासाठी सर्व नागरिकांनी साथ द्यायला हवी. जलदिनी पाण्याचे रक्षण करू, त्याचे नुकसान होणार नाही, असा संकल्प करू.

हे ही वाचा:

कर्माची फळे!! राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडण्यास सांगितले नसते तर आज ते खासदार असते!

जागतिक उद्दिष्ट २०३० पण भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मूक्त होणार

भारत दौऱ्यावर आलेले अजय बंगा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

नेक्सजेनचे अध्यक्ष पियूष द्विवेदी म्हणाले की, भारताला जलसंकटाचा सामना करावा लागतो आहे. अनेक असे विभाग आहेत जे पाण्याच्या कमतरतेचा सामना करत आहेत. त्या आव्हानाचा आपण सामना करायला हवा. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळेल याचा विचार केला पाहिजे.

मोलिटिक्सचे संस्थापक अनुदीप जागलान, सीओओ शांतनु शुक्ला, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट सोफिया मेहता यांनीही या परिषदेच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले तसेच पाण्याच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वळविणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. आम्हाला हे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. हे काम आम्ही येत्या काळातही करत राहू.

या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून  जेवियर मॅन्युअल पॉलिनिच वेलार्डे, पेरू उपस्थित होते तर अन्य अतिथींमध्ये ताहिना रासमोइलिना (मादागास्कर), श्री अलेक्झांडर रिबास (रशियाचे भारतातील व्यापार राजदूत डॉ. के.एल. गंजू (कोमोरो संघाचे महावाणिज्यदूत), मेजर जनरल दिलावर सिंह (महासंचालक एनवायकेएस), डॉ. गौरव गुप्ता (संस्थापक अध्यक्ष जीटीटीसीआई), बीसीसीआई चेतन शर्मा, प्रतीक द्विवेदी (ज्येष्ठ पत्रकार), हर्षवर्धन त्रिपाठी (ज्येष्ठ पत्रकार), रमेश अवस्थी (सहारा समय टीव्हीचे समूह संपादक), राणा यशवंत (इंडिया न्यूजचे महाव्यवस्थापक), मोहसिन खान (प्राइम न्यूजचे प्रमुख संपादक), मनोज डूमरा (एमडी एफएम न्यूज़), विनीता यादव (एमडी न्यूज नशा), अदित कुशवाहा (सीईओ और निदेशक ऍक्सिस एन्कॉर्प), अजीत पांडे (गंगोत्री न्यूजचे संचालक), जयंत सनवाल (बेल्जियम क्रिकेट बोर्डाचे माजी संचालक), अमायरा यादव, रोहित शर्म आणि हरिकेश सिंह.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा