30.7 C
Mumbai
Friday, June 19, 2026
घरदेश दुनियास्लोव्हाकियाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान

स्लोव्हाकियाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Google News Follow

Related

स्लोव्हाकियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशातील सर्वोच्च सन्मान प्रदान केला. यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्लोव्हाकिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ प्रदान करण्यात आला.

स्लोव्हाकिया दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मिळालेला हा सन्मान भारतासाठी मोठे राजनैतिक यश मानला जात आहे. परदेशी राष्ट्राकडून पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३३वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा सन्मान स्वीकारल्यानंतर मोदी यांनी स्लोव्हाकियाचे नागरिक आणि सरकार यांचे आभार मानले. तसेच हा सन्मान भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील दृढ मैत्रीला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “ब्रातिस्लावा येथे ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ हा सन्मान मिळाल्याने मला गौरव वाटत आहे. हा सन्मान भारतातील १४० कोटी जनतेचा आहे. या सन्मानासाठी मी स्लोव्हाकियाचे नागरिक आणि सरकार यांचा मनःपूर्वक आभारी आहे. भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील चिरस्थायी मैत्रीला मी हा पुरस्कार समर्पित करतो.”

हे ही वाचा:

अमेरिकन एअर फोर्सचे बी-52 बॉम्बर कोसळले; आठ जणांचा मृत्यू

नीट परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

मान्सून सुस्तावला; आणखी आठवडाभर प्रतीक्षा

इराणने अण्वस्त्रांना दिला कायमचा नकार!

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रीनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “सोमवारी राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उत्पादन क्षेत्र, वाहतूक, नवोपक्रम, गुंतवणूक, ऊर्जा, जैवइंधन यांसारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच दोन्ही देशांतील जनसंपर्क अधिक दृढ करण्यावरही चर्चा झाली.” पंतप्रधानांनी स्लोव्हाकियातील उद्योगपतींसोबतही बैठक घेतली आणि भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा