30 C
Mumbai
Wednesday, November 12, 2025
घरदेश दुनियामुस्लिमबहुल ताजिकिस्तानमध्ये हिजाब बंदी; पुरुषांना दाढी ठेवण्यास मनाई

मुस्लिमबहुल ताजिकिस्तानमध्ये हिजाब बंदी; पुरुषांना दाढी ठेवण्यास मनाई

जूनमध्ये कायदा लागू; अंमलबजावणी आता काटेकोरपणे सुरू

Google News Follow

Related

मध्य आशियामधील मुस्लिमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानमध्ये हिजाब आणि बुरख्यासारख्या इस्लामिक पोशाखावर बंदी घालण्यात आली आहे. ताजिकिस्तानमध्ये गेल्या ३० वर्षांपासून सत्तेवर असलेले अध्यक्ष इमोमाली रहमान यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धार्मिक ओळख देशाच्या विकासात अडथळा आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने यावर्षी जूनमध्ये हा कायदा लागू केला होता. मात्र, आता त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू झाली आहे.

ताजिकिस्तान देश हा सोव्हिएत युनियनपासून वेगळा झालेला आहे. ताजिकिस्तान हा मुस्लिम देश अफगाणिस्तान, चीन, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमांनी वेढलेला आहे. हुकूमशहा इमोमाली यांनी देशातील मुस्लिम महिलांना हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. यासोबतच पुरुषांना मोठी दाढी ठेवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियम न पाळल्यास दंड आणि शिक्षेचा नियम करण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे देशातील कट्टरतावादाचा प्रसार थांबेल, असा विश्वास इमोमाली यांनी व्यक्त केला आहे.

नव्या कायद्यात दाढी कापण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. यासाठी सरकारने नैतिक पोलिस तैनात केले आहेत. तसेच कायद्याचे पालन न केल्यास एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आणि शिक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. २०२० च्या जनगणनेनुसार, ताजिकिस्तानमधील ९६ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. १९९४ पासून सत्तेत असलेल्या इमोमाली रहमान यांनी दाढी वाढविण्यासही बंदी घातली आहे. या निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल लोकांना शिक्षा आणि मोठा दंड सहन करावा लागतो.

हे ही वाचा : 

‘काँग्रेसचे पंतप्रधान इफ्तार पार्टी देत असत आणि सरन्यायाधीश तिथे जात, त्याचे काय?’

पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !

मशिदीचा अनधिकृत भाग सांगा आम्हीच काढून घेतो

धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी, मोहम्मद उमर गौतमसह १२ जणांना जन्मठेप

ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरच्या सभागृह मजलिसी मिलीने १९ जून रोजी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान मुलांच्या परदेशी पोशाखावर बंदी घालण्याची तरतूद आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह मजलिसी नमोयांदगोन यांनी ८ मे रोजीच विधेयक मंजूर केले होते आणि बुरखा आणि हिजाब यांसारखे विदेशी कपडे घालण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. विधेयकावरील चर्चेदरम्यान, ताजिकिस्तानच्या संसदेने सांगितले की, महिलांचे चेहरे झाकणारा बुरखा हा ताजिक परंपरा किंवा संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे या विदेशी पोशाखांवर बंदी घातली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा