27 C
Mumbai
Thursday, February 12, 2026
घरक्राईमनामाबांगलादेशात बाहेरून कुलूप लावून हिंदूंची घरे जाळली!

बांगलादेशात बाहेरून कुलूप लावून हिंदूंची घरे जाळली!

चितगावमधील धक्कादायक घटना

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध क्रूर हिंसाचार सुरूच असून सातत्याने हिंदूंना कट्टरपंथीय गटांकडून लक्ष्य केले जात आहे. गेल्या आठवड्यात हिंदू तरुण दीपू चंद्र दास याची हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. या घटनेने जगभरात संताप व्यक्त केला जात असताना पुन्हा हिंसक घटना समोर आली आहे. चितगावमधील हिंदू कुटुंबांची घरे जाळण्यात आली आहेत.

चितगावमध्ये हिंदू कुटुंबांना लक्ष्य करण्यात आले. हिंदूंची घरे जाळण्यात आली. घरे जाळण्यापूर्वी बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पीडित कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी अनेक हिंदू घरांना बाहेरून कुलूप लावून नंतर घरे पेटवली. लोकांना आत अडकवून त्यांना जाळून मारण्याचा हेतू असल्याचे पीडितांनी सांगितले. घरे मातीची असल्याने लोक आग लागलेल्या घरांमधून पळून जाण्यात यशस्वी झाले.

वृत्तानुसार, मुस्लिम हल्लेखोरांच्या गटाने घरांना बाहेरून कुलूप लावले, नंतर त्यांच्यावर पेट्रोल ओतले आणि त्यांना आग लावली. हल्ल्यात अनेक घरे पूर्णपणे उध्वस्त झाली. सुदैवाने रहिवासी दरवाजे तोडून किंवा मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर, परिसरात दहशत पसरली असून अनेक कुटुंबांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

पीडितांचे म्हणणे आहे की, हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि अल्पसंख्याक समुदायाला धमकावून त्यांना परिसरातून पळून जाण्यास भाग पाडण्याचा उद्देश होता. आगीमुळे वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेले पैसे, बचत आणि उपजीविका नष्ट झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा..

“युनूस सरकारमधील एका गटाने शरीफ उस्मान हादीची हत्या केली”

“… नाहीतर कार्यालय पेटवून देऊ” ग्लोबल टीव्ही बांगलादेशला धमकी

भारताची अंतराळात मोठी झेप! इस्रोकडून सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित

मदरसा विधेयकाची माघार घेण्यास योगी मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी हिंदूंवरील हिंसाचारासाठी मोहम्मद युनूस यांना जबाबदार धरले आणि विचारले की मोहम्मद युनूस हिंदूविरोधी क्रूर मुस्लिमांविरुद्ध कारवाई करतील का? तस्लिमा नसरीन यांनी घरे जाळतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला. त्यांनी लिहिले की, “चितगावमधील रोझनमध्ये क्रूर मुस्लिमांनी हिंदूंच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद केले, त्यावर पेट्रोल ओतले आणि त्यांना आग लावली. घरे राख झाली. हिंदूंना त्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांच्या घरातून बाहेर पडणे कठीण झाले. ते त्यांची घरे कशी पुन्हा बांधतील? युनूस हिंदूविरोधी क्रूर मुस्लिमांवर कारवाई करतील का? ते हिंदूंना नुकसानभरपाई देतील का? की बातमी परदेशात पसरली नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येईल? हिंदूंना जाळून मरण्याची परवानगी देणार का?” असे सवाल त्यांनी युनूस सरकारला विचारले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा