भारतीय उपखंडात अलीकडे निर्माण झालेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतावर प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांनंतर विशेषतः पहलगाम हल्ल्यामुळे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला आता देशांतर्गत फुटीरतावादाचा मोठा धोका जाणवत आहे. देश आर्थिक संकटात सापडलेला असून, वेगवेगळ्या प्रांतांतून स्वातंत्र्याच्या मागण्या प्रबळ होत आहेत.
बलुच, सिंधी आणि पश्तून या अल्पसंख्याक समुदायांनी स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून केली आहे. या समुदायांवर पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेकडून अन्याय, छळ आणि भेदभाव होत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत.
बलुचिस्तान मुक्ती आंदोलन
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात, बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आणि संयुक्त राष्ट्रांकडे ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ मान्यतेची मागणी केली.
इतिहासानुसार, बलुचिस्तान पूर्वी ‘खान ऑफ कलात’च्या अधिपत्याखाली स्वतंत्र राज्य होते. ११ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान आणि कलातमध्ये ब्रिटिशांच्या मध्यस्थीत ‘स्टँडस्टील करार’ झाला होता, ज्यात कलातला स्वतंत्र मान्यता देण्यात आली होती. मात्र, १९४८ मध्ये पाकिस्तानने दबाव टाकून बलुचिस्तानचा पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने समावेश केला.
या विलिनीकरणानंतर बलुच जनतेमध्ये असंतोष वाढला आणि १९४८, १९५८, १९६२, १९७३-७७ आणि २००० नंतर सतत उठाव झाले. सध्या BLA हे बलुच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत आहे. ‘Kill and Dump’ धोरणाखाली पाकिस्तान सैन्याने बलुच नेत्यांची हत्या, अपहरण आणि अत्याचार केले आहेत.
ऑप इंडियाने या सगळ्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
सिंधुदेशासाठी लढा
‘जिये सिंधू फ्रीडम मूव्हमेंट (JSFM)’ या राजकीय संघटनेने सिंध प्रांत स्वतंत्र करून ‘सिंधुदेश’ नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची मागणी जोरदारपणे मांडली आहे. सिंधी लोक पाकिस्तानकडून त्यांच्या संस्कृतीचा नाश केला जातोय असा आरोप करतात. उर्दू भाषेचा सक्तीचा वापर, जमिनी बळकावणे आणि स्थानिक नेत्यांची हत्या व बेपत्ता करणे हे त्यांचे मुख्य आक्षेप आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेसने १९९१ला केलेला करार हा देशद्रोह नाही का?
महाकालेश्वर मंदिराजवळील बेगमबाग परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
वैष्णवी हागवणेचे सासरे, दीर सापडले, पोलिसांनी केली अटक
पश्तूनिस्तानचा उदय
पश्तून हे पंजाबींनंतर पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे समुदाय आहेत. त्यांची लोकसंख्या सुमारे १५% आहे. पश्तून लोकांचा प्रदेश ‘पश्तूनिस्तान’ पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये विभागला गेला आहे.
पश्तून लोकांनी १८९३ च्या ‘ड्युरंड लाईन’ सीमारेषेला नाकारले आहे. अलीकडच्या काळात, पश्तून तहफ्फुज मूव्हमेंट (PTM) या नागरिक हक्क चळवळीने पश्तून स्वातंत्र्याचा लढा उचलून धरला आहे. त्यांनी सैन्याच्या अमानुष कारवाया, बेकायदेशीर अटक व हत्या यावर आवाज उठवला आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानमधील असंतोष
गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताच्या पाकव्याप्त काश्मीर (PoK) भागातील एक महत्त्वाचा आणि सुंदर भाग आहे, मात्र तो पाकिस्तान सरकारच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित राहिला आहे. हा प्रदेश अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉर, चीनच्या शिंजियांग, लडाख आणि काश्मीरने वेढलेला आहे. येथील नागरिकांनी पाकिस्तानी लष्करावर जमिनी बळकावण्याचे आणि स्थानिक लोकांची जमीन लुटण्याचे आरोप केले आहेत.
१९७१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
धार्मिक आधारावर भारताचा भाग तोडून स्थापन झालेल्या पाकिस्तानमध्ये आजही प्रतिनिधिक सरकाराऐवजी लष्करी राजवट चालते. पाकिस्तानच्या लष्करी आणि इस्लामिक धोरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दडपण्यात आली आहे. सिंधी, बलुच, पश्तून, गिलगिट-बाल्टिस्तान आणि फाटा या सर्व भागांतील नागरिकांनी आता हत्यार उचलले असून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. १९७१ मध्ये बंगालच्या लोकांवर झालेल्या दडपशाहीमुळे बांगलादेशची निर्मिती झाली होती. आज जे अलगाववादी प्रवाह पाकिस्तानमध्ये दिसत आहेत, तेच इतिहासाची पुनरावृत्ती घडवू शकतात.







