मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराजवळील बेगमबाग परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या उज्जैन विकास प्राधिकरण आणि पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना समजावले. त्यानंतर प्राधिकरण व स्थानिक नागरिकांनी समन्वयाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आज (२३ मे) तीन अतिक्रमित मालमत्तांवर कारवाई करण्यात येणार आहे, ज्या एकूण २८ चिन्हांकित संपत्त्यांपैकी आहेत.
सुरुवातीला जेव्हा प्राधिकरण आणि पोलीस बेगमबाग परिसरात अतिक्रमण हटवण्यास गेले, तेव्हा स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, पोलिसांनी शांततेत परिस्थिती हाताळली आणि लोकांना कायदेशीर बाजू समजावून सांगितली.
प्रकरणाचे मूळ
उज्जैन विकास प्राधिकरणाचे सीईओ संदीप सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर १९९८ मध्ये रहिवासासाठी लीजवर देण्यात आला होता, परंतु नंतर त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आला. याशिवाय बऱ्याच जणांनी लीजचे नूतनीकरण (रिन्यू)ही केले नाही, जे लीजच्या अटींचे उल्लंघन आहे. प्राधिकरणाकडून अनेक वेळा नोटीस पाठवल्यानंतरही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने, आता लीज रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या मालमत्ता प्राधिकरणाच्या मालकीच्या मानल्या जातील. या जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम म्हणजे अतिक्रमण असेल.
हे ही वाचा:
काँग्रेसने १९९१ला केलेला करार हा देशद्रोह नाही का?
आमचे पाणी अडवले, तर आम्ही तुमचा श्वास रोखू!
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
९८ लाखाचे सोने, परकीय चलन जप्त
कायदेशीर कारवाईची प्रक्रिया
सीईओ सोनी म्हणाले, “सध्या प्राधिकरणने फक्त ३ संपत्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण उर्वरित २५ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयीन निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.”
प्राधिकरणाने सुरुवातीला व्यावसायिक मालमत्तांमधील वस्तू हटवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानंतरच बुलडोझर करवाईला सुरुवात होईल.
पोलिस सुरक्षा आणि सहकार्य
एसीपी नितेश भार्गव यांनी सांगितले की, “अतिक्रमण हटवताना कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी १५० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ५ वाजल्यापासूनच प्राधिकरण आणि पोलीस कार्यरत आहेत. अनेकांनी सहकार्य दाखवत स्वेच्छेने घरे रिकामी केली आहेत.”
