28.7 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरदेश दुनिया“माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, तर इराणवर १,००० क्षेपणास्त्रे डागणार”

“माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, तर इराणवर १,००० क्षेपणास्त्रे डागणार”

ट्रम्प यांचा इशारा

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर आणि थेट इशारा दिला आहे. “जर इराणने माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेची १,००० क्षेपणास्त्रे आधीच लक्ष्य साधून सज्ज आहेत. असा प्रयत्न झाला, तर इराणवर अभूतपूर्व लष्करी कारवाई केली जाईल,” असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-इराण संबंधांमध्ये आणखी तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला इशारा दिला. त्यांनी लिहिले की, “इराणने माझ्या हत्येचा प्रयत्न केल्यास अमेरिकेची १,००० क्षेपणास्त्रे इराणकडे रोखून ठेवली आहेत. एवढ्यावरच कारवाई थांबणार नाही, त्यानंतर आणखी मोठे हल्ले होतील.” ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी संरक्षण यंत्रणेला आधीच स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जर त्यांच्या हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला, तर अमेरिकेने इतिहासात कधीही न पाहिलेल्या प्रमाणात इराणवर हल्ला करावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे सांगितले. मात्र, या कथित सूचनांबाबत अमेरिकन प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

२०२० मध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कासेम सुलेमानी ठार झाल्यापासून ट्रम्प हे इराणच्या संभाव्य लक्ष्यांच्या यादीत असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. अलीकडेच इराणमधील काही कट्टर गटांकडून ट्रम्प यांच्या हत्येची उघडपणे भाषा करण्यात आल्याच्या वृत्तांनंतर हा इशारा समोर आला आहे.

हे ही वाचा:

१९९६ श्रीनगर हिंसाचार प्रकरणात शब्बीर शाहसह सहा हुर्रियत नेत्यांविरोधात आरोपपत्र

जामा मशिदीत हनुमान चालिसाचे पठण करून घेणार का?

महिला डॉक्टर मारहाणप्रकरणी नगरसेवक म्हात्रे यांना पोलीस कोठडी

मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर; पंतप्रधान लक्सन यांनी मिठी मारून केले स्वागत

अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत काही संभाव्य धोके असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही अहवालांनुसार, परदेश दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या प्रवास व्यवस्थेतही शेवटच्या क्षणी बदल करण्यात आले होते.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात लष्करी हालचाली, निर्बंध, क्षेपणास्त्र हल्ले आणि राजनैतिक संघर्ष यामुळे वातावरण आधीच तापलेले आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांचा हा इशारा परिस्थिती आणखी गंभीर बनवू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा