पाकिस्तानी पत्रकार आणि विश्लेषक सय्यद मुझम्मल शाह यांनी पाकीस्तानवर टीका करत त्यांच्या देशाचे कमकुवत पत्ते उघड केले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत ते म्हणाले की, जर हे युद्ध १० दिवसांपेक्षा अधिक काळ चालले असते तर पाकिस्तान अपयशी ठरला असता.
सय्यद मुझम्मल शाह म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष १० दिवसांपेक्षा अधिक काळ चालला असता तर, पाकिस्तान अपयशी ठरला असता याचे कारण म्हणजे पाकिस्तान दीर्घ युद्ध लढण्यास सक्षम नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप कमकुवत आहे आणि आयएमएफच्या मंजुरीशिवाय आपण सैन्याचे बजेट देखील ठरवू शकत नाही. ते पुढे म्हणाले की, आजच्या जगात शक्तिशाली होण्यासाठी कोणत्याही देशाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी देखील असले पाहिजे.
“जग असे झाले आहे की, संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटना आता काहीही करत नाहीत. त्यांच्याकडे युद्ध थांबवण्याची किंवा कोणत्याही आक्रमकावर निर्बंध लादण्याची शक्ती नाही. जर तुमच्या खिशात पैसे असतील आणि मजबूत सैन्य असेल तर तुम्ही जगात काहीही करू शकता. हे जग एका अराजक व्यवस्थेचा भाग आहे ज्यामध्ये कोणतीही जागतिक संघटना हस्तक्षेप करू शकत नाही. आपण स्वतःला कसे मजबूत करायचे आणि नंतर जगाशी कसे व्यवहार करायचे हे पाश्चात्य देशांकडून शिकले पाहिजे,” असे सय्यद मुझम्मल शाह म्हणाले.
पाकिस्तानी विश्लेषक पुढे म्हणाले की, आपल्याकडे सीमेवर एक मजबूत सैन्य तैनात आहे, परंतु आपण त्यासाठी बजेट देखील देऊ शकत नाही, तर आपण कसे लढणार? आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आयएमएफ ठरवते. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी देखील आपल्या पंतप्रधानांना आयएमएफकडे जावे लागते. परिस्थिती अशी आहे की जर युद्ध १० दिवसांपेक्षा जास्त काळ चालले तर आपण लढू शकणार नाही. कारण भारताकडे पैसे आहेत, परंतु आपल्याकडे नाहीत.
हे ही वाचा :
राष्ट्रपतींनी ‘राफेल’ विमानातून केले उड्डाण!
आशियाई युवा स्पर्धेत रुपेरी चमक दाखविणाऱ्या शौर्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
भाजपा कार्यकर्त्यांना आग लावू, निवडणूक आयोगाचे पाय मोडू!
ट्रम्प यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने! काय म्हणाले ट्रम्प?
पाकिस्तानला अमेरिकेशी संबंध वाढवण्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
एवढेच नाही तर त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेशी संबंध वाढवण्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला. सय्यद मुजम्मल शाह म्हणाले की, अमेरिकेशी संबंध मजबूत केले पाहिजेत, परंतु त्यांना आमच्या जमिनीचा वापर करू देऊ नये हे लक्षात ठेवले पाहिजे. जर आपण असे केले तर आपण चीनला गमावू. ते आपल्याला म्हणतील की आम्ही तुम्हाला इतके भांडवल दिले आणि CPEC, BRI सारखे प्रकल्प दिले. तरीही, अमेरिकेला येथे का आणले गेले? अशा प्रकारे, अमेरिकेच्या बदल्यात आपण चीन गमावू.







