पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्यांनी मतदार यादी पुनर्विलोकन (एनआरसी) प्रक्रियेदरम्यान हिंसक आणि चिथावणीखोर विधाने केली आहेत. बर्धमान (उत्तर) येथील टीएमसी आमदार निशीथ मलिक यांनी एका सभेत उघडपणे धमकी दिली की, जर भाजपने एसआयआर (SIR) प्रक्रियेच्या नावाखाली कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव वगळण्याचा प्रयत्न केला, तर भाजप कार्यकर्त्यांना सार्वजनिकपणे आग लावू.
या वक्तव्याला अधिक चालना टीएमसी मंत्री आणि कोलकाता महापौर फिरहाद हकीम यांच्या विधानाने मिळाली. हकीम म्हणाले की ते CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) चा तीव्र विरोध करतील. त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर संगनमताचा आरोप करत चेतावणी दिली की, “जर त्यांनी NRC लागू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे पाय मोडले जातील.” हकीम यांनी पुढे सांगितले की, “जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत, तोपर्यंत भाजपला राज्यात NRC लागू करण्याची हिंमत होणार नाही.”
हे ही वाचा :
ट्रम्प यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने! काय म्हणाले ट्रम्प?
फॅक्टचेकर म्हणवणाऱ्या अल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरला बसला फटका
ममदानीने बेकायदेशीर परदेशी देणग्या घेतल्याचा आरोप
दिलजीत दोसांझने अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श केला, संतापलेल्या खलिस्तानी गटाने दिली धमकी!
#WATCH | West Bengal Minister and Kolkata Mayor, Firhad Hakim, says, "We attended the all-party meeting. I have made it clear on behalf of my party that if the name of even one genuine voter is removed, we will oppose the SIR. We will not allow the name of even a single genuine… pic.twitter.com/VhgYBsvCu1
— ANI (@ANI) October 28, 2025
दोन्ही टीएमसी नेत्यांनी इशारा दिला आहे की, जर एकही खऱ्या मतदाराचे नाव यादीतून वगळले गेले, तर ते त्याचा तीव्र विरोध करतील. दरम्यान, भाजप नेते एस. आर. बॅनर्जी यांनी या विधानांचा निषेध करत म्हटले की, टीएमसी हिंसा आणि गोंधळ निर्माण करण्याची रणनीती आखत आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की, एसआयआर प्रक्रिया केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीत पार पडावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखली जाईल.







