बहारीन इथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा – २०२५ मध्ये १०० मीटर अडथळा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल महाराष्ट्राच्या शौर्या अंबुरे हीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुळची ठाण्याची असलेल्या शौर्या अंबुरे हिने १३.७३ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले.
हे ही वाचा:
ममदानीने बेकायदेशीर परदेशी देणग्या घेतल्याचा आरोप
ट्रम्प यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने! काय म्हणाले ट्रम्प?
भाजपा कार्यकर्त्यांना आग लावू, निवडणूक आयोगाचे पाय मोडू!
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “काबुल भारताची बाहुली झालाय!”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आशियाई युवा स्पर्धेत रौप्यपदक पटकावून शौर्याने भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. भारताला रुपेरी चमक तिने मिळवून दिली आहे. तिच्या या कामगिरीसाठी तिचे अभिनंदन आणि तिला खूप शुभेच्छा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, शौर्याच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. शौर्या एआयएम स्पोर्ट्स फाऊंडेशन येथे प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिच्यातला खेळाडू घडवणाऱ्या अजित कुलकर्णी यांचे देखील मन:पूर्वक अभिनंदन!शौर्या हिला पुढील उज्ज्वल आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!







