अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारताने अखेर अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांच्या प्रशासनाच्या अन्याय्य व्यापार पद्धती उघड करण्याच्या प्रयत्नांमुळे भारताने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, भारताने हे पाऊल उचलले कारण कारण कोणीतरी अखेर त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश करत आहे. अमेरिकन व्यवसायांना नुकसान पोहोचवणाऱ्या व्यापार धोरणांवर बोलताना ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतासह आणखी काही देशांना परस्पर कर लागू करण्याचा इशारा दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
“भारत आमच्याकडून प्रचंड शुल्क आकारतो. तुम्ही भारतात काहीही विकूही शकत नाही. तसे, त्यांनी मान्य केले आहे; ते आता त्यांचे शुल्क कमी करू इच्छितात कारण कोणीतरी अखेर त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश करत आहे,” असे ट्रम्प म्हणाले. भारत सरकार अमेरिकेतून होणाऱ्या महत्त्वाच्या आयातीवरील कर कमी करण्याचा विचार करत असून अनेक क्षेत्रातील कंपन्या व्यवसाय सातत्य सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकन भागीदारांशी संवाद साधत आहेत, असे अनेक अहवाल समोर आले आहेत.
“भारत आमच्याकडून १०० टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारतो, चीनचा आमच्या उत्पादनांवर सरासरी शुल्क आमच्यापेक्षा दुप्पट आहे आणि दक्षिण कोरियाचा सरासरी शुल्क चार पट जास्त आहे. हे मित्र आणि शत्रू दोघांकडून घडत आहे. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही; ती कधीच नव्हती. २ एप्रिल रोजी परस्पर शुल्क लागू होईल. ते आमच्यावर कोणताही कर लावतील, आम्ही त्यांच्यावर कर लावू,” असे ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच अमेरिकन काँग्रेसला संयुक्त भाषणात सांगितले. प्रत्येक देशाने आपल्याला अनेक दशकांपासून फसवले असून आम्ही ते आता होऊ देणार नाही.
हे ही वाचा :
माशांच्या हालचालींवर नजर ठेवायला चीन- मालदीवमध्ये करार? नक्की हेच कारण की ड्रॅगनचा वेगळाच मनसुबा?
मणिपूरमध्ये लष्कराच्या विशेष कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त; बंकरही केले उध्वस्त
गुन्हेगारांच्या उपस्थितीत पोलिस अंमलदाराचा जंगी ‘हॅप्पी बर्थडे’
ट्रम्प समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली जपानची जनता त्यांच्या विजायानंतर शांत का झाली?
शुक्रवारी, ट्रम्प प्रशासनासोबत भारताच्या व्यापार कराराची देखरेख करणारे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारताने लावलेल्या शुल्कांबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले की, मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की भारतात जगातील काही सर्वाधिक शुल्क आहेत, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील विशेष संबंधांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक होईल. भारतात जगातील सर्वात जास्त कर आकारले जातात हे पुन्हा सांगताना, लुटनिक यांनी कमी वेळात कर करार कसा करता येईल याबद्दलची त्यांची कल्पना मांडली. विशिष्ट उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला.







