सध्याच्या युगात बर्थडे म्हटले तर धुमधडाक्यात १२ वाजता सेलिब्रेशन करण्याची प्रथाच पडली आहे. सेलिब्रेशनच्या नावाखाली कानठळ्या बसतील असे फटाक्यांचे बार, धांगडधिंगा आणि मोटार सायकलची रेस काढली जाते. त्यानंतर दोन चार भाई दादा, समोर येवून चाकू, तलवार, आयफोनने केके कापतात. याचे फोटो काढून सोशल मिडीयावर शेअर करत आपण किती श्रीमंत आहोत, आपली किती हवा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत अनेक असे व्हिडीओ समोर आले आहेत, येत आहेत. याच दरम्यान, आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचे समोर आले आहे. मात्र, हा व्हिडीओ कोणत्या भाई-दादाचा नाहीतर चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याचा आहे. विशेष म्हणजे, पोलीस कर्मचाऱ्याच्या बर्थडे सेलिब्रेशन खुद्द गुन्हेगारांकडून केल्याचे समोर आले आहे.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार प्रवीण पाटीलचा वाढदिवस ६ मार्च रोजी होता, त्याच्या आदल्या रात्री पोलिसाचे मित्रमंडळी सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झाले आणि फटाके, बॉम्ब लावत बर्थडे साजरा केला. यावेळी ड्रोन द्वारे रिल्स शुटींग करण्यात आले. पोलीस अंमलदाराचा बर्थडे साजरा झाला, पण यावेळी चार गुन्हेगार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली.
हे ही वाचा :
ट्रम्प समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली जपानची जनता त्यांच्या विजायानंतर शांत का झाली?
“औरंग्याच्या थडग्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये तर किल्ल्यावरील मंदिरासाठी केवळ ३,००० रुपये”
चौपट क्षमतेने राज्याचा विकास करायचा आहे!
…आणि फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची केली पोलखोल!
दरम्यान, हे प्रकरण समोर येताच पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अंमलदार प्रवीण पाटील याच्यांसह अन्य सहकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे, सुहास डंगारे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची उचल बांगडी करत नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.
गुन्हेगारांकडून पोलिसाच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन – सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचे चार गुन्हेगारांच्या उपस्थितत बर्थडे सेलिब्रेशन.. ड्रोन द्वारे रिल्स शुटींग @PCcityPolice @Dev_Fadnavis pic.twitter.com/pI7WcysXs3
— Archana More-Patil (@Archana_Mirror) March 7, 2025