हरियाणा येथील पंचकुलाजवळ शुक्रवारी (७ मार्च) मोठी दुर्घटना घडली. पंचकुला येथील मोरनीजवळ बालदवाला गावात भारतीय हवाई दलाचे (IAF) जग्वार लढाऊ विमान कोसळले. अपघात झाल्यानंतर विमानाचे अवशेष दूरपर्यंत विखुरले गेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या प्रकरणी भारतीय वायू दलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
जग्वार लढाऊ विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. याच दरम्यान विमानाचा अपघात झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळले ,असे भारतीय वायूसेनेने म्हटले आहे. या दुर्घटनाग्रस्त जग्वार जेट विमानाचा पायलट सुखरूप आहे, पॅराशुटच्या मदतीने तो खाली उतरण्यात यशस्वी झाला. तसेच विमानाचा अपघात गावाच्या दाट वस्ती बाहेर झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे ही वाचा :
चांदा ते बांदा…आंदोलनजीवी नेत्यांनाही मकोका लावणार काय?
ट्रम्प समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली जपानची जनता त्यांच्या विजायानंतर शांत का झाली?
“औरंग्याच्या थडग्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये तर किल्ल्यावरील मंदिरासाठी केवळ ३,००० रुपये”
मणिपूरमध्ये लोकांनी लुटलेली हजारो शस्त्रे पोलिसांना सुपूर्द!
भारतीय वायू दलाने अपघाताची माहिती दिली. आयएएफने पोस्टकरत म्हटले, भारतीय वायुसेनेचे एक जग्वार फायटर जेट विमान यंत्रणेतील बिघाडामुळे क्रॅश आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, एका व्हिडिओमध्ये विमानाचे अवशेष जमिनीवर विखुरलेले आणि काही भाग अजूनही जळत असल्याचे दिसत आहे.
https://youtu.be/olJAe-KxUQM?si=–HALQOLd8uFj3ap