मणिपूरमध्ये शांतता राखण्यात मणिपूर पोलिसांनी यश मिळत आहे. राज्यातील लोकांनी मणिपूर हिंसाचारात लुटलेली आणि बेकायदेशीरपणे ठेवलेली शस्त्रे स्वेच्छेने परत केली आहेत. पोलिसांनी केलेल्या आव्हानाला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनामुळे, लोकांनी दोन आठवड्यांच्या कालावधीत हिंसाचारात लुटलेली आणि बेकायदेशीरपणे ठेवलेली शस्त्रे-दारुगोळासह अशी एकूण एक हजाराहून अधिक शस्त्रे सुरक्षा दलांना सुपूर्द केली आहेत. तथापि, हा आकडा तात्पुरता आहे आणि सर्व जिल्ह्यांमधील तपशील इम्फाळमधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर आत्मसमर्पण केलेल्या शस्त्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या कालावधीत खोऱ्यातील ५ जिल्हे, ५ डोंगराळ जिल्हे आणि जिरीबाममधील लोकांनी सुमारे १,०२३ शस्त्रे परत केली आहेत. सुपूर्द केलेल्या शस्त्रांमध्ये ९ मिमी पिस्तूल, सब-मशीन गन (एसएमजी), कोल्ट-मशीन गन (सीएमजी), सेल्फ-लोडिंग रायफल्स (एसएलआर), मॉडिफाय केलेले स्नायपर्स, चिनी ग्रेनेड, इन्सास आणि एके ५६ रायफल्स यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, गेल्या दोन आठवड्यात लोकांनी बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, रेडिओ सेट, गणवेश, शूज आणि स्थानिकरित्या बनवलेले मोर्टार (पोम्पे) सारख्या वस्तू देखील परत केल्या आहेत.
हे ही वाचा :
…आणि फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची केली पोलखोल!
न्यूझीलंड अंतिम फेरीत भारताचा विजयीरथ रोखणार?
काशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!
जागतिक महिला दिन : नौदलाच्या महिला लेबेनॉनमध्ये आयोजित करणार योगसत्र
एका निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, शस्त्रे जमा करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, सुरक्षा दलांनी राज्यातील विविध ठिकाणी शोध मोहिमांमध्ये ३६ शस्त्रे, १२९ दारूगोळा, ७ स्फोटके, २१ इतर वस्तू जप्त केल्या आणि १५ बेकायदेशीर बंकर देखील नष्ट केले. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना सुरक्षा दलांकडून लुटलेली शस्त्रे आणि इतर बेकायदेशीरपणे ठेवलेली शस्त्रे ७ दिवसांच्या आत परत करण्याचे आवाहन केले होते. तथापि, लोकांनी अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर, ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली होती.