शुभमन गिल, स्टीव स्मिथ आणि अॅनाबेल सदरलंड हे फेब्रुवारीसाठी आयसीसी पुरुष आणि महिला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकनात समाविष्ट आहेत. आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये शुभमन गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवलेला आहे. हाच फॉर्म त्याच्या पथ्यावर पडलेला आहे.
गिलने या स्पर्धेपूर्वी इंग्लंडविरुद्ध भारताच्या मालिकाविजयात उत्कृष्ट कामगिरी करत दमदार कामगिरी केली होती. तसेच चॅम्पियन ट्रॉफीच्या बांगालादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीच एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने ८७ आणि ६० धावांचे योगदान दिले, त्यानंतर अहमदाबादमध्ये ११२ धावांची दमदार खेळी करत मालिका भारताच्या नावावर केली.
हेही वाचा :
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची हॉटेल सहाराच्या खोलीत घेतला गळफास
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात होळी साजरी करण्यास विरोध करणे संतापजनक!
भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री परत येतोय, निवृत्तीतून घेतला यू-टर्न!
मुंबई काँग्रेस कार्यालयाचे १८ लाख भाडे, ५ लाखांचे वीज बिल थकले, आता टाळे लागणे बाकी!
साउथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी उत्तम कामगिरी केली आहे. फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये झालेल्या मालिकेत शानदार प्रदर्शन करत त्याने मधल्या फळीत महत्त्वपूर्ण धावा केल्या. २८ आणि २० धावांचे नाबाद योगदान दिल्यानंतर लाहोरमधील मालिकेत त्याने ७४ चेंडूंमध्ये १०६ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने सात गगनचुंबी षटकार लगावले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्टीव स्मिथच्या कामगिरीत काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. मात्र गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत स्टँड-इन कर्णधार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजासोबत १४१ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि दुसऱ्या कसोटीत १३१ धावा करत ऑस्ट्रेलियाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला. यामुळे त्याला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला आणि आयसीसी टेस्ट फलंदाजांच्या अव्वल पाच क्रमवारीत पुनरागमन करता आले.