भारत असो, परदेशाची भूमी असो किंवा आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्र, भारतीय सेनादलातील शूर महिला अधिकारी आणि विरांगना देशाची प्रतिष्ठा उंचावत आहेत. ८ मार्च या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अग्निवीर म्हणून आपले प्रशिक्षण पूर्ण करून अनेक महिला सैनिक नौदलात सामील होत आहेत.
नौदलाच्या दोन महिला अधिकारी समुद्री वादळांना पार करत विश्व परिक्रमेच्या त्यांच्या मिशनवर पुढे जात आहेत. त्याचबरोबर भारतीय महिला सैनिक योगाभ्यासाच्या माध्यमातून परदेशी भूमीवर महिलांच्या कल्याणासाठी आणि तिथे राहणाऱ्या महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भारतीय महिला सैनिक भारतीय संस्कृतीच्याही ध्वजवाहक आहेत. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र अंतरिम दल (UNIFIL) अंतर्गत सेवा देणाऱ्या भारतीय बटालियनने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एल फर्डिसमध्ये महिलांसाठी एक विशेष योग सत्र आयोजित केले.
लेबनॉनमधील या उपक्रमाचा उद्देश संघर्षग्रस्त क्षेत्रातील महिलांमध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक स्थिरता आणि सामाजिक एकता वाढवणे हा होता. प्रशिक्षित प्रशिक्षकांनी या सत्रामध्ये तणाव मुक्ती तंत्रे, माइंडफुलनेस प्रॅक्टिस आणि एकूण आरोग्य दृष्टिकोनांवर मार्गदर्शन केले.
हे ही वाचा:
डब्ल्यूपीएल २०२५ : अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याने हरमनप्रीतवर दंड
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात
मुंबई काँग्रेस कार्यालयाचे १८ लाख भाडे, ५ लाखांचे वीज बिल थकले, आता टाळे लागणे बाकी!
अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करून, UNIFIL शांतता रक्षकांनी स्थानिक समुदायांना आपले समर्थन देणे सुरू ठेवले आहे. तसेच हे दाखवून दिले आहे की शांतता मोहिमा केवळ सुरक्षा पुरवण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सामाजिक आणि भावनिक कल्याणाचाही विचार करतात. भारतीय महिला सैनिकांचे हे शौर्य या उपक्रमातून प्रकर्षाने जाणवते.
विश्व परिक्रमेवर निघालेल्या नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि रूपा ए. या भारतीय नौदलाच्या सेलिंग व्हेसल बोट तारिणीवर स्वार आहेत. महिला दिनाच्या आधीच्या शुक्रवारीही त्यांचा हा प्रवास सुरूच आहे. सध्या त्या दोन्ही अधिकारी समुद्रातून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने प्रवास करत आहेत.