अलीगड मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) हिंदू विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्यास मनाई केल्यानंतर राजकारण तापले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार बृजलाल यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा निर्णय दुर्दैवी आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार बृजलाल यांनी आयएएनएससोबत बोलताना म्हटलं, “हे दुर्दैवी आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठ कोणतंही अल्पसंख्याक विद्यापीठ नाही, तर हे महाराजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या जमिनीवर बांधलेले आहे. तिथे होळी साजरी करण्यास परवानगी न देणं हे दुर्दैवी आहे. माझं मत आहे की शासनाने या प्रकरणात निर्णय घ्यावा आणि तिथल्या प्रशासनाने व्यवस्था करावी की सण साजरा करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. एएमयूने जे केलं आहे, ते चुकीचं आहे आणि मी त्याची निंदा करतो.”
त्यांनी संभल येथील पोलिस अधिकारी अनुज चौधरी यांच्या वक्तव्यावर म्हणाले, “संभल जर मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की तिथे होळी साजरी करू दिली जाणार नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी योग्यच वक्तव्य केलं की, जुम्मा तर वर्षातून ५२ वेळा येतो. होळी वर्षातून एकदाच येते. होळी साजरी करू न देणं हे दुर्दैवी आहे. मी एवढंच सांगेन की होळी साजरी केली जाईल आणि असं करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.”
हे ही वाचा:
भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री परत येतोय, निवृत्तीतून घेतला यू-टर्न!
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
भाजप खासदार बृजलाल यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या ‘पीओके’ संबंधित वक्तव्यावर म्हटलं, “परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अगदी बरोबर म्हटलं आहे की जर आपण पीओकेला भारतात सामील करू, तर काश्मीर समस्येचं समाधान होईल. मला वाटतं की हे होणारच.”
अलीगड मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) हिंदू विद्यार्थ्यांनी होळी साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती, परंतु त्यांना अद्याप त्याची परवानगी मिळालेली नाही.
करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानेंद्र सिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, जर एएमयू प्रशासन होळी साजरी करण्यास परवानगी देत नाही, तर १० मार्चला रंग भरनी एकादशीच्या दिवशी करणी सेनेचे कार्यकर्ते स्वतः एएमयूच्या आत जाऊन हिंदू विद्यार्थ्यांसोबत होळी खेळतील आणि होळी मिलन समारंभाचं आयोजन करतील. त्यांनी विचारलं की, हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का केला जात आहे.