पत्नी आणि मावस सासुच्या छळाला कंटाळून ४१ वर्षीय व्यक्तीने मुंबईतील विलेपार्ले येथील सहारा स्टार या हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी विमानतळ पोलिसांच्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या आईच्या तक्रारीवरून पत्नी आणि मावस सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
निशांत त्रिपाठी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निशांत त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात राहण्यास होते.सध्या ते विरार येथे पत्नी अपूर्वासह राहत होते, एनीमेंशन आणि चित्रपट निर्मिती उद्योगात काम करणारे निशांत त्रिपाठी हे स्वतःची एनिमिशन कंपनी चालवत होते. पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून मागील काही दिवसापासून निशांत विलेपार्ले येथील हॉटेल सहारा स्टार येथे एक खोली घेऊन राहत होते.
२८ फेब्रुवारी रोजी निशांतने त्याच्या खोलीच्या दारावर ‘व्यत्यय आणू नका’ असे फलक लावले आणि बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तो प्रतिसाद देण्यास असमर्थ झाला, तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर की वापरून त्याच्या खोलीत प्रवेश केला आणि तो दोरीने लटकलेला आढळला. माहिती मिळताच, विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवला.
हे ही वाचा :
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात होळी साजरी करण्यास विरोध करणे संतापजनक!
डब्ल्यूपीएल २०२५ : अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवल्याने हरमनप्रीतवर दंड
झेलेन्स्की अमेरिकेसोबत रशियाशी शांतता चर्चा करणार!
प्रत्येक दिवस महिला दिन असावा! : साक्षी मलिक
तपासादरम्यान, पोलिसांना निशांतच्या कंपनीच्या वेबसाइटवर जतन केलेली एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये तो अॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड होता. इंग्रजी भाषेतील नोटमध्ये, निशांतने त्याच्या पत्नीवर प्रेम व्यक्त केले परंतु तिच्या आणि तिच्या मावशी प्रार्थना मिश्रा (५०) यांच्या सततच्या छळामुळे त्याने आपले जीवन संपवले असे म्हटले. त्याने आपल्या मृत्यूसाठी दोघांनाही जबाबदार धरले.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या नीलम चतुर्वेदी-त्रिपाठी (६४) निशांत यांची आई असून त्यांनी गुरुवारी मुंबईत आल्या व त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात सून आणि सुनेची मावशी हे दोघे निशांतच्या मृत्यूला जवाबदार असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पत्नी अपूर्वा त्रिपाठी आणि मावस सासू प्रार्थना मिश्रा (५०) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.