26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेष"औरंग्याच्या थडग्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये तर किल्ल्यावरील मंदिरासाठी केवळ ३,००० रुपये"

“औरंग्याच्या थडग्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये तर किल्ल्यावरील मंदिरासाठी केवळ ३,००० रुपये”

अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा हिंदू जनजागृती समितीचा इशारा

Google News Follow

Related

बॉलीवूडचा सिनेमा ‘छावा’ प्रदर्शित होताच छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावरून लोकांसमोर आला. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या सिनेमाने मराठ्यांच्या शौर्याचा आणि मुघलांच्या क्रूरतेचा खरा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला. यानंतर राज्यातही औरंगजेबच्या क्रूरतेची चर्चा असून राज्यात असलेल्या औरंगजेबच्या थडग्याला उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे. या दरम्यान, औरंगजेबच्या थडग्यावर मात्र सरकारची मेहेरनजर असल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकारातून यासंदर्भात माहिती उघड झाली असून संताप व्यक्त केला जात आहे. हिंदू जनजागृती समितीकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आला असून औरंग्याच्या थडग्याला देणारे अनुदान बंद केले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या थडग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जाते, असे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२१- २२ मध्ये २,५५,१६० रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, वर्ष २०२२- २३ मध्ये (नोव्हेंबर पर्यंत) २,००,६२६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत सुमारे ६.५० लाख रुपये खर्च झाले आहेत.

दुसरीकडे, मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरासाठी महाराष्ट्र शासनाकडून केवळ २५० रुपयांची मासिक मदत दिली जाते. म्हणजे वर्षाला केवळ ३,००० रुपयांची मदत दिली जाते. यावरून हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेत औरंग्याच्या थडग्याला देणारे अनुदान बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे.

एकीकडे औरंग्याच्या थडग्याचे जतन करण्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसा दिला जात असताना दुसरीकडे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या मंदिरांसाठी किंवा गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरेसा पैसा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून थडग्यासाठी खर्च केलेली गेल्या १० वर्षांची आकडेवारीचं आता जनतेसमोर आली आहे. हजारो, लाखोंचा हा खर्च बघून हिंदुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनिल घनवट यांनी म्हटले आहे की, जर्मनमध्ये कुणीही हिटलरचे समर्थन करत नाही. महाराष्ट्रात आणि देशात जर कोणी औरंग्याचे समर्थन करणार असेल तर महाराष्ट्र सरकारने त्याचा परिणाम दाखवला आहे. त्या व्यक्तीचे निलंबन होते. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी. औरंगजेबचे उदात्तीकरण करणारे हे सरकार नसल्याची खात्री आहे. त्यामुळे थडग्याला मिळत असलेले अनुदान तत्काळ बंद केले जाईल. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या औरंग्याने हालहाल करून मारले त्याची कबर इथे ठेवायची की नाही हे सरकारने ठरवावे.

हे ही वाचा : 

…आणि फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची केली पोलखोल!

न्यूझीलंड अंतिम फेरीत भारताचा विजयीरथ रोखणार?

काशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!

जागतिक महिला दिन : नौदलाच्या महिला लेबेनॉनमध्ये आयोजित करणार योगसत्र

औरंगजेबच्या थडग्याच्या देखभालीसाठी दिलेली मदत सरकारने तात्काळ थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी संपूर्ण आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा हिंदू समाज या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा