28.6 C
Mumbai
Tuesday, July 21, 2026
घरदेश दुनियाडेंग्यूवर 'सुपर शिल्ड'! भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी

डेंग्यूवर ‘सुपर शिल्ड’! भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी

QDENGA लसीची WHO ने देखील केली शिफारस

Google News Follow

Related

पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असते. डेंग्यू हा एडीस एजिप्ती (Aedes aegypti) या डासाच्या चाव्यामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात वाढतो. पावसाळ्यात घराभोवती किंवा परिसरात पाणी साचल्यास या डासांची संख्या झपाट्याने वाढते. आता डेंग्यूच्या आजारावर बचावासाठी एका लसीला मंजूरी मिळाली असल्याने डेंग्यूच्या धोक्यापासून प्रतिबंधात्मक उपाय सापडला आहे. या प्रतिबंधात्मक व्हॅक्सीनचे नाव QDENGA (क्यूडेंगा) आहे. या लसीला जपानची फार्मा कंपनी Takeda ने तयार केले आहे. भारतात ड्रग कंट्रोलर जनरलनी(DCGI) या लसीला ४ ते ६० वर्षांच्या लोकांसाठी मंजूरी दिली आहे.

QDENGA ही भारतात मंजूरी मिळणारी पहिली डेंग्यू व्हॅक्सीन आहे. या लसीची खासियत म्हणजे या लसीला लावण्याच्या आधी त्या व्यक्तीला आधी डेंग्यू झाला आहे की नाही याची टेस्ट करण्याची काही गरज नाही. म्हणजे ही व्हॅक्सीन कोणालाही घेता येते. जर कोणाला आधी डेंग्यू झाला असेल तर त्यालाही ही लस घेता येते. जर डेंग्यू झाला नसेल तरीही लस घेता येते. या व्हॅक्सीनला ४ ते ६० वयोगटातील कोणत्याही लोकांना घेता येणार आहे. याचे एकून दोन डोस घ्यावे लागणार आहेत. दोन्ही डोस दरम्यान तीन महिन्यांचे अंतर राखावे लागणार आहे. ही व्हॅक्सीन त्वचेच्या खाली सिरींज द्वारे घेता येणार आहे.

डेंग्यूची सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशात भारताचा समावेश होतो. जगातील एक डेंग्यूच्या प्रकरणात एक तृतीयांश केस भारतात असतात. गेल्या २० वर्षात भारतात डेंग्यूचे रिपोर्ट केलेल्या प्रकरणात सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे. साल २०२५ मध्ये देशात १.१३ लाखाहून जास्त प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्यक्षात याहून जास्त प्रकरण भारतात असतात. डेंग्यूचे चार प्रकार असून या चार प्रकारासाठी ही डेंग्यूची लस घेतल्यास बचाव करता येतो असे कंपनीने म्हटले आहे. QDENGA ला अशा प्रकारे तयार केले आहे की डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून यात बचाव होऊ शकतो.

QDENGA वर आता पर्यंत मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कंपनीच्या मते आतापर्यंत २८ हजाराहून अधिक लोकांवर याची चाचणी करण्यात आली आहे. क्लीनिकल ट्रायलमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर १२ महिन्यानंतरही डेंग्यू पासून बचावात ८०.२ टक्के परिणाम आढळला आहे. डेंग्यूमुळे रुग्णालयात भरती होण्याची जोखीम ९०.४ टक्के कमी करण्यात या लसीला यश आले आहे. साडे चार वर्षांनंतरही डेंग्यूमुळे रुग्णालयात भरती होण्यापासून बचावात ८४.१ टक्के परिणाम राहिला आहे. तर सात वर्षांपर्यंत याच्या सुरक्षा आणि प्रभाव कायम राहिला असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीची शिफारस केली आहे. ज्या देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे. तेथे ही लस पब्लिक व्हॅक्सीनेशन प्रोग्रॅममध्ये सामील करण्यास काही हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. या व्हॅक्सीनला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रीक्वालीफिकेशन देखील मिळाले आहे. ब्राझील, अर्जेंटीना, कोलंबिया आणि इंडोनेशिया प्रीक्वालीफिकेशन प्रोग्रॅममध्ये देखील हीचा समावेश केला गेला आहे.

हे ही वाचा:

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत रणकंदन

संसदेकडे निघालेल्या मोर्चावर अश्रुधुराची कारवाई

‘चला संसद’ मोर्चापूर्वी अभिजीत दिपकेंनी सोडले उपोषण

मानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा