भारत-पाकिस्तानात युद्ध सुरू? भारत लाहोर, कराचीपर्यंत घुसला

पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताने केले निष्फळ, तीन विमाने पाडली

भारत-पाकिस्तानात युद्ध सुरू? भारत लाहोर, कराचीपर्यंत घुसला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष ८ मे रोजी टिपेला पोहोचला. पाकिस्तानातील लाहोर, कराची, रावळपिंडी येथील संरक्षण यंत्रणा भारताने सकाळी ड्रोनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील विविध शहरांवर ड्रोन हल्ले केले तसेच विमानेही पाठवली. त्याला नंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत लाहोर, कराची, सियालकोट या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताची तिन्ही दले एकाचवेळी पाकिस्तानवर आक्रमण करत आहेत. एकप्रकारे या दोन देशात अघोषित युद्ध सुरू झाले. युद्धाची अद्याप दोन्ही देशांकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे अखेर भारताला त्याचे चोख उत्तर द्यावे लागले.

भारताने पूँछ, जैसलमेर, जालंधर, चंदीगढ, जम्मू, अखनूर याठिकाणी पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांना चोख उत्तर देत सगळे ड्रोन निष्प्रभ केले. भारताच्या S 400 या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने हे सगळे ड्रोन खाली पाडले. तिकडे पाकिस्तानने सीमेपलिकडून तोफगोळ्यांचा मारा सुरू ठेवला. त्यातच पाकिस्तानची तीन विमाने पाडण्यातही भारताला यश आले. त्यात एफ १६ आणि जेएफ १७ या विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानकडे असलेल्या चिनी युद्धसामुग्रीने दगा दिल्याचे दिसले आहे. पाकिस्तानच्या एअर वॉर्निंग सिस्टीमलाही भारताने निष्प्रभ केले आहे.

हे ही वाचा:

“आमच्या संयमाची परीक्षा घ्याल तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल”

पंतप्रधानांनी सचिवांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक

गृहमंत्री अमित शाह यांचा झारखंड दौरा रद्द

रावळपिंडीतील PSL स्टेडियमच्या बाहेर ड्रोन हल्ला

 

भारताने पाकिस्तानला इशारा देऊनही हल्ले करण्याची आगळीक केल्यामुळे अखेर भारताने लाहोर, कराची येथे आक्रमण केले आहे. त्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण भारताने कराचीत नौदलाच्या माध्यमातून तर लाहोरमध्ये लष्कराच्या माध्यमातून हल्ले केले आहेत.  सकाळी भारताने लाहोर, रावळपिंडी या प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करून त्यांची संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली होती, त्यावरून भारत आता पाकिस्तानमध्ये शिरकाव करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला होता.

एकीकडे पाकिस्तान भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना बलुचिस्तानने उठाव केला आहे. बलुचिस्तानमध्ये आयडी स्फोट करून पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणले जात आहे. पेशावरमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने पाक सैन्याविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला लढावे लागते आहे.

पाकिस्तानातील प्रमुख शहरात ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.

पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा दिला होता. ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतावादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले पण ते सगळेच निष्फळ ठरले. किंबहुना, त्यांचा एक पायलट भारताच्या ताब्यात आहे.

 

Exit mobile version