पहलगाम येथे २५ हिंदूंसह २६ जणांची निर्घृण हत्या दहशतवाद्यांनी केल्यानंतर भारताने याचा योग्य पद्धतीने सूड घेतला जाईल असा सज्जड इशारा दिला होता, त्याची सुरुवात भारतीय लष्कराने अर्थात सेनादल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे ७ मे रोजी रात्री २ च्या सुमारास केली ती पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या ठिकाणांवर जोरदार हल्ला करून. ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताने ही मोहीम सुरू केली आहे आणि पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. न्याय केला, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
मुझफ्फराबाद, कोटली, भावलपूर येथे हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने याला उत्तर देण्याची भाषा केली आहे.ही लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनांची केंद्रे भारताने लक्ष्य केल्याचे दिसते आहे.

हे ही वाचा:
भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!
राज्यातील ‘या’ १६ शहरात होणार ‘मॉक ड्रिल’!
सलीम पठाणवर वक्फ बोर्डाचे विश्वस्त असल्याचे भासवून भाडे उकळल्याचा आरोप
या हल्ल्याची दृश्ये समोर येऊ लागली आहेत. तूर्तास हा फक्त दहशतवादी ठिकाणांवर असलेला हल्ला म्हटला जात आहे पण पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले तर भारतही त्याला सडेतोड उत्तर देईल, असे म्हटले जात आहे.
भारतीय लष्कराने एक्सवर ऑपरेशन सिंदूर सुरू असे म्हणत ही मोहीम सुरू झाल्याची घोषणा केली. ७ मे रोजी एकीकडे मॉक ड्रिल देशभरात होईल, असे म्हटले जात असताना भारताने त्याआधी उत्तररात्री भारताने पाकिस्तान साखरझोपेत असताना हा हल्ला केला आहे.
पाकिस्तानने या हल्ल्याची कबुली दिली असून तूर्तास दहशतवादी मसूद अझरच्या मदरशाला लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतमाता की जय असे एक्सवर पोस्ट करत या हल्ल्याची पुष्टी केली आहे.







