28 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरदेश दुनियाकुवैतच्या वीज, जल प्रकल्पावरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

कुवैतच्या वीज, जल प्रकल्पावरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या आठ

Google News Follow

Related

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कुवैतमधील वीज आणि जल प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूसह इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या किमान आठ झाली आहे.

कुवैतच्या वीज आणि जल मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून प्रकल्पातील एका सर्व्हिस बिल्डिंगचे नुकसान झाले आहे. मंत्रालयाने या हल्ल्याला खाडी देशाविरुद्धची पापपूर्ण इराणी आक्रमकता असे म्हटले आहे. तसेच तांत्रिक आणि आपत्कालीन पथकांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले असून नुकसान नियंत्रणात आणण्यासाठी आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी गेल्या गुरुवारी (३० मार्च) संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथेही एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला अडवताना त्याचे अवशेष खाली पडल्यामुळे हा मृत्यू झाला होता. त्यावेळी भारतीय दूतावासाने सांगितले होते की, “आम्ही यूएई अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून शक्य ती सर्व मदत पुरवत आहोत.” दरम्यान, सोमवारी पहाटे बहरीन, यूएई आणि सौदी अरेबिया येथे एअर रेड सायरन वाजल्याच्या बातम्या समोर आल्या. अहवालानुसार, बहरीनमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, जे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते क्षेपणास्त्र अडवण्याच्या कारवाईचा परिणाम होते.

हे ही वाचा:

अमेरिका खर्ग बेट ताब्यात घेणार? काय म्हणाले ट्रम्प?

अभिनेता विजयने आपल्या वाहनचाहकाच्या मुलाला दिले तिकीट

‘मन की बात’: ऊर्जा संकटात एकजूट राहा!

अमेरिकेचे मरीन कमांडो इराणमध्ये उतरले

दरम्यान, हा संघर्ष आता पाचव्या आठवड्यात दाखल झाला आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली आणि त्यानंतर तणाव झपाट्याने वाढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे इस्रायल आणि खाडी देशांना लक्ष्य केले आहे, जिथे अमेरिकेची लष्करी तळे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य चर्चेचे संकेत दिले असले तरी संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यांनी अलीकडेच सांगितले की, ६ एप्रिलपर्यंत इराणी ऊर्जा ठिकाणांवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले जातील. मात्र, इराणने इशारा दिला आहे की त्याच्या ठिकाणांवर हल्ला झाल्यास तो खाडी क्षेत्रातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा