29 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरदेश दुनियारशियन भाषेतील ‘तिरुक्कुरल’ने जोडला भारत-रशिया सांस्कृतिक धागा

रशियन भाषेतील ‘तिरुक्कुरल’ने जोडला भारत-रशिया सांस्कृतिक धागा

पुतिन यांना मोदींची खास भेट

Google News Follow

ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी नवी दिल्ली येथे भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना तामिळनाडूच्या प्राचीन साहित्यपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ‘तिरुक्कुरल’चा रशियन भाषेतील अनुवाद भेट म्हणून दिला. या भेटीतून भारताच्या प्राचीन साहित्य आणि सांस्कृतिक वारशाची ओळख रशियन राष्ट्राध्यक्षांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली. रशियन भाषेतील तिरुक्कुरल पुतिन यांना भेट देताना आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. या ग्रंथाचा रशियन भाषेतील अनुवाद दोन्ही देशांमधील लोकांचे परस्पर संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

तिरुक्कुरल हा तामिळ साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ मानला जातो. संत तिरुवल्लुवर यांनी रचलेल्या या ग्रंथात मानवी जीवन, सदाचार, शासन, समाज आणि नैतिक मूल्यांशी संबंधित विचार मांडण्यात आले आहेत. त्यामुळे पुतिन यांना तिरुक्कुरलची रशियन प्रत देणे ही केवळ राजनैतिक भेट न राहता भारताच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारी भेट ठरली आहे.

हे ही वाचा:

मदतीला ना पाकिस्तान, ना अमेरिका! हूतींच्या संकटात सौदी अरेबिया एकटा?

जागतिक अर्थव्यवस्थेचा नवा केंद्रबिंदू ब्रिक्स

विरोधकांची रडारड; आयएमएफ मात्र भारताच्या जीडीपीवर खुश

साखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

पुतिन यांचा भारत दौरा १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर होत आहे. भारत यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत असून, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ही परिषद होणार आहे. ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्याबरोबरच पुतिन यांची मोदींसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही झाली. मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेत भारत-रशिया संबंधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. व्यापार, ऊर्जा, संरक्षण, अणुऊर्जा, महत्त्वाची खनिजे, उत्पादन क्षेत्र आणि रेल्वे यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा