30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरदेश दुनियाभारतीय वंशाच्या नीलला अमेरिकेत मिळाली अडीच लाख डॉलर्स

भारतीय वंशाच्या नीलला अमेरिकेत मिळाली अडीच लाख डॉलर्स

रोगाचे त्वरित निदान करण्यावर केले संशोधन

Google News Follow

Related

भारतीय वंशाच्या १७ वर्षीय नील मुदगलला त्याच्या “आरएनए रेणूंच्या संरचनेचा अंदाज लावण्यासाठी संगणक मॉडेल विकसित केल्याबद्दलच्या” प्रकल्पासाठी डेव्हिडसन फेलो स्कॉलरशिप म्हणून २५०००० (अडीच लाख) यूएस डॉलर्स मिळाली आहे. यामुळे रोगाचे त्वरित निदान होऊ शकते आणि त्याच्या या प्रकल्पामुळे शास्त्रज्ञांना कर्करोग, विषाणू, अनुवांशिक विकार, आणि इतर रोगांवर उपचार अधिक सहजपणे विकसित करण्यास मदत करू शकेल, असे त्याने म्हंटले आहे. या प्रकल्पावर २०२० च्या उन्हाळ्यात त्याने काम करण्यास सुरुवात केल्याचे निलने सांगितले.

निलचे आजोबा हे अल्झायमरने ग्रस्त आहेत. नीलने त्यांचा त्रास बघितला आहे. माझ्या कामाचा समाजाला काहीतरी फायदा व्हावा असे निल हा पुरस्कार मिळाल्यावर म्हणाला. याच स्पर्धेत सहाव्या स्थानावर १७ वर्षीय अंबिका ग्रोव्हर हिला ८०,००० यू एस डॉलर्स आणि नवव्या स्थानावर १८ वर्षीय सिद्धू पचिवाला याला ५०,००० यूएस डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

या सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धेत एकूण २००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात ४० जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. रेजेनेरॉन फार्माने प्रायोजित केलेल्या सोसायटी फॉर सायन्सच्या म्हणण्याप्रमाणे मुदगलचा संगणकीय जीवशास्त्र आणि बायोइंफॉरमॅटिकस प्रकल्प हा कर्करोग, ऑटोम्युन सारख्या रोगांवर नवीन निदान आणि उपचार यावर औषध विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या आर एन ए रेणूंच्या संरचनेच्या वेगवान अंदाज लावू शकतो.

हे ही वाचा:

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

रेजेनेरॉनचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष जॉर्ज येकोपोलास हे स्वतः १९७६ चे विज्ञान प्रतिभा शोध प्रतियोगितेचे विजेते आहेत. यांचे मुख्यालय हे न्यूयॉर्क येथे आहे. या अनुभवाने रोग बरे करण्यावर काम करण्याची खात्री पटली असून ते पुढे म्हणाले कि, मी फक्त आशा करू शकतो की, या वर्षीच्या विध्यार्थ्यांना शास्त्रज्ञ, अभियंते अशी पुढची पिढी चांगली बनण्यासाठी प्रेरणा मिळेल. जे जगातल्या सर्वात मोठ्या अशा आव्हानासाठी उपाय विकसित करतील आणि पुढे जातील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा