26 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरक्राईमनामाधक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

धक्कादायक !! अमृता फडणवीस यांना धमकावून १ कोटीची लाच देऊ केली

मलबार हिल पोलिस ठाण्यात केली तक्रार,

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या स्पष्ट आणि परखड विधानांबद्दल चर्चेत असतात. आता त्यांची चर्चा होते आहे ती त्यांनी केलेल्या तक्रारीची.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीनुसार एका डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेने अप्रत्यक्षरीत्या धमकावून, कट रचून १ कोटींची लाच ऑफर करण्याचा केला प्रयत्न. अमृता फडणवीस यांच्या संपर्कात संबंधित आरोपी महिला जवळपास १६ महिने होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल १ कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे

‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?

अमृता फडणवीस यांना फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलीय. आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. आरोपी महिलेचे नाव अनिष्का असे असून तिच्या वडिलांनाही या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा