33 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेत अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या २७९० भारतीयांना परत पाठवले!

अमेरिकेत अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या २७९० भारतीयांना परत पाठवले!

अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीयांच्या निर्वासनाबाबत भारत सरकारची माहिती

Google News Follow

Related

भारतातील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) अमेरिकेत योग्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या भारतीय नागरिकांबाबत अद्ययावत माहिती जाहीर केली आहे. सरकारने सांगितले की जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण २७९० भारतीयांना अमेरिकेतून परत भारतात पाठविण्यात आले आहे.

गुरुवारी (३० ऑक्टोबर) या विषयावर भाष्य करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल म्हणाले की हे नागरिक “ठराविक निकषांनुसार पात्र नव्हते आणि तेथे बेकायदेशीररित्या राहत होते.”

जयसवाल यांच्या मते, “या वर्षाच्या जानेवारीपासून आजपर्यंत २७९० पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे,” कारण ते आवश्यक पात्रता निकषांमध्ये बसत नव्हते आणि बेकायदेशीररीत्या राहत होते. त्यांनी सांगितले की, भारतात परत पाठवण्यापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखीची आणि नागरिकत्वाची पडताळणी केली होती. त्यांनी पुढे स्पष्ट केले, “ही आकडेवारी कालपर्यंतची म्हणजेच २९ ऑक्टोबरपर्यंतची आहे.”

जयसवाल यांनी हेही स्पष्ट केले की भारत केवळ योग्य कायदेशीर कारणांवरच निर्वासन स्वीकारतो. परत पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्ती खरोखरच भारतीय नागरिक आहे की नाही, याची खात्री भारत सरकार करते. हे संपूर्ण काम भारत आणि अमेरिका यांच्यातील कायदेशीर व राजनैतिक प्रक्रियेद्वारे केले जाते.

त्यांनी पुढे सांगितले की अशा प्रकरणांचा संबंध केवळ अमेरिकेशीच नाही. याच वर्षी ब्रिटनमधून सुमारे १०० भारतीय नागरिकांना त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी केल्यानंतर भारतात परत पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘आता पाकिस्तान अन त्याच्या मालकांना भारताची ताकद कळली आहे’

अलीगढ: मंदिरांवर “आय लव्ह मोहम्मद” लिहिताना स्पेलिंग चुकले आणि पोलिसांनी पकडले

मालेगावमधून १० लाखांच्या बनावट नोटांप्रकरणी मौलानाला अटक

राष्ट्रीय एकतेचा पोलादी पाया रचणारा ‘लोहपुरुष’

तसेच, अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांची संख्या मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घटली आहे. अमेरिकन कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) च्या नव्या आकडेवारीनुसार, अशा प्रयत्नांची संख्या गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे.

सीबीपीच्या ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अमेरिकन अधिकाऱ्यांनी ३४१४६ भारतीयांना अनधिकृतपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतले. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ६२ टक्के घटलेली आहे. मागील वर्षी ही संख्या ९०४१५ होती. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, ही सातत्यपूर्ण घट आहे, ज्यावरून दिसते की स्थलांतर व्यवस्थापनासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा