25 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरदेश दुनियाभारतीय ग्राहकांचे हित सर्वोच्च! ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने दिले उत्तर

भारतीय ग्राहकांचे हित सर्वोच्च! ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने दिले उत्तर

नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, ट्रम्प यांनी केलेला दावा

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. यावर आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय ग्राहकांना नेहमी प्राधान्य देऊन हित जपणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भारत सरकारने यावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे की, त्यांची प्राथमिकता ही आपल्या नागरिकांचे कल्याण आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारत मोठ्या प्रमाणात गॅस आणि तेल आयात करतो. अस्थिर बाजारपेठेत भारतीय ग्राहकांच्या हिताची सेवा करणे हे आमचे प्राधान्य नेहमीच राहिले आहे. आमचे आयात धोरण पूर्णपणे या उद्देशावर आधारित आहे. आम्ही इतर कोणत्याही घटकांच्या प्रभावाखाली निर्णय घेत नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही बाजार परिस्थितीनुसार वेगवेगळ्या देशांशी व्यवहार करतो. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याकडून खरेदी देखील केली आहे. गेल्या दशकात हे प्रमाण झपाट्याने वाढले. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा संबंध वाढविण्यालाही प्राधान्य दिले आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा..

क्रिप्टो फसवणूक प्रकरणात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलाविरुद्ध शोध वॉरंट

आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल

“पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलेय, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही”

अमृतसरमध्ये अवैध शस्त्र, ड्रग्जसह ३ तस्करांना अटक

भूतकाळात जेव्हा अमेरिका किंवा युरोपीय देशांनी रशियाकडून तेल खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, तेव्हा भारताने असे निर्बंध लादता येणार नाहीत असे उत्तर दिले होते. युरोप रशियाकडून सर्वाधिक गॅस कसा खरेदी करतो हे भारताने वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने रशियन तेल खरेदी करण्यावर तसेच ब्रिक्स संघटनेवरही आक्षेप आहेत. मंगळवारी त्यांनी म्हटले की ब्रिक्स संघटना डॉलरवर थेट हल्ला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा