37 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरदेश दुनियाजगभरातील मुस्लिम कट्टरवाद्यांचे ज्यू विरोधी फुत्कार

जगभरातील मुस्लिम कट्टरवाद्यांचे ज्यू विरोधी फुत्कार

Google News Follow

Related

इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यातील संघर्षाचे पडसाद आता संपूर्ण जगात उमटू लागले असले तरी इस्रायलने या प्रकरणात केलेल्या बचावाचे समर्थन करण्याऐवजी पॅलेस्टिनच्या दहशतवादी कृत्यांचे समर्थन केले जात आहे. बेल्जियममध्ये तर इस्रायलमधील ज्यू धर्मियांविरोधात मुस्लिम कट्टरवाद्यांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. इस्रायलविरोधात खैबर जिहाद पुकारण्याच्या घोषणा या निदर्शकांकडून देण्यात येत होत्या. तसे व्हीडिओ प्रसारित झाले आहेत. त्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बेल्जियमप्रमाणे, बोस्टन, नेदरलँडस, ग्रेट ब्रिटन, जर्मनीतही ज्यू धर्मियांविरोधात छोटी-मोठी आंदोलने करण्यात आल्याचा दावाही करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अरबी समुद्रात वादळे जागतिक तापमानावाढीमुळे?

म्युकर मायकोसिसने पिंपरी चिंचवडला वेढले

रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना

ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे

लंडनच्या रस्त्यावरील असाच एक व्हीडिओ ट्विटरवर गाजत असून त्यात उत्तर लंडनच्या फिंचले रोडवर एका रस्त्यावर गाड्या थांबलेल्या दिसत आहेत. त्यातून पॅलेस्टिनचे झेंडे फडकावत ज्यू धर्मियांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे दिसते आहे. या व्हीडिओवरूनही लोकांच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. मुख्य म्हणजे लंडनमधील हा व्हीडिओ सरकारमधील मंत्री असलेल्या रॉबर्ट जेनरिक यांनीच टाकला आहे. त्यांनी यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

या देशांतच नव्हे तर भारतातही अनेक लोक हे पॅलेस्टिनचे समर्थन करत असून इस्रायलने केलेल्या बचावालाही आक्रमणाचे नाव देण्यात येत आहे.

आतापर्यंत पॅलेस्टिनने इस्रायलवर जवळपास साडेतीन हजार रॉकेट्स डागले आहेत आणि त्याला इस्रायलने आपल्या आयरन डोम तंत्राद्वारे चोख उत्तर दिले आहे. पॅलेस्टिनच्या सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले न करता पॅलेस्टिन अतिरेक्यांना सडेतोड प्रत्युत्तर इस्रायलने दिले आहे. पॅलेस्टिनच्या या हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला होता. आता पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ काही मुस्लिम राष्ट्रेही पुढे आली आहेत. त्यामुळे एकप्रकारे पॅलेस्टिनच्या दहशतवादाचेही समर्थन केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा