22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरदेश दुनियाहमास हल्ल्यातून बचावलेल्या इस्रायली युवकाने स्वतःला घेतले पेटवून

हमास हल्ल्यातून बचावलेल्या इस्रायली युवकाने स्वतःला घेतले पेटवून

...म्हणून त्याने जगण्याची आशाच सोडली!

Google News Follow

Related

हमासच्या भीषण हल्ल्यातून वाचलेला इस्रायलचा रोई शालेव या युवकाने अखेर दोन वर्षांनी मानसिक वेदना सहन न झाल्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. ३० वर्षीय शालेवचा मृतदेह त्याच्या जळालेल्या कारमधून सापडला. ही घटना हमासच्या नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलवरील नरसंहाराच्या दुसऱ्या वर्धापनदिनीच्या काही दिवसांनंतरची आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली शेवटची पोस्ट

मृत्यूपूर्वी काही तास आधी शालेवने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. “कृपया माझ्यावर रागवू नका. कोणीही मला समजू शकत नाही, आणि ते ठीक आहे. मला फक्त हे दुःख संपवायचं आहे. मी जिवंत आहे, पण आतून सगळे मृतवत झाले आहे.” यानंतर काही तासांतच तो तेल अवीवमध्ये आपल्या जळालेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला.
इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार, तो शेवटचा दिसला जेव्हा त्याने इंधनाचा डबा खरेदी केला होता.

हे ही वाचा:

गॉल ब्लॅडर: शरीराचा महत्त्वाचा अवयव…

युद्धबंदी होताच ट्रम्प इस्रायल दौऱ्यावर

धन धना धन धन…मंधाना! रचला इतिहास

खसखस: शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करणारे औषध

प्रेयसी आणि मित्राचा पाहिला होता मृत्यू

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यात नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ३७८ लोक ठार झाले होते, ज्यात ३४४ नागरिकांचा समावेश होता. त्या दिवशी शालेव आपली प्रेयसी मापल अ‍ॅडम आणि मित्र हिली सोलोमन सोबत फेस्टिव्हलला आला होता. हल्ला सुरू झाल्यावर तिघेही एका कारखाली लपले. शालेवने मापलच्या अंगावर झोपून मृत असल्याचा बहाणा केला. तथापि, हमासच्या गोळीबारात दोघेही जखमी झाले, पण मापलचा तिथेच मृत्यू झाला.

आईनेही केली होती आत्महत्या

धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्यानंतर काही दिवसांनी शालेवची आईसुद्धा, जी मापल अ‍ॅडमच्या अतिशय जवळची होती, स्वतःच्या कारला आग लावून आत्महत्या केली होती.

मापल अ‍ॅडमच्या बहिणीची हृदयस्पर्शी पोस्ट

मापलची बहीण मायान अ‍ॅडम हिने शनिवारी शालेवसोबतचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “रोईचा खून ७ ऑक्टोबरलाच झाला होता; काल तो प्रत्यक्षात मरण पावला. शब्द सापडत नाहीत. आशा करते, हे दोघं आता वर कुठेतरी एकमेकांच्या मिठीत असतील.”

 तो आमच्या समुदायाचा कणा 

हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करणारी संघटना नोव्हा ट्राइब कम्युनिटी फाउंडेशनने शालेवचे वर्णन केले की, “तो आमच्या समुदायाचा कणा होता — धाडसी, नम्र आणि नेहमीच इतरांना मदत करणारा.”

फाउंडेशनने पुढे म्हटले, “त्याच्या धैर्याची, नेतृत्वाची आणि मैत्रीची आठवण नेहमी राहील. तो नोव्हा ट्राइब बास्केटबॉल संघाचा कर्णधार होता आणि प्रत्येक कठीण क्षणी मित्रांना आधार देत असे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा